वृत्तपत्र विक्रेता सत्कार

वृत्तपत्र विक्रेता सत्कार

फोटो 85276

संगीतप्रेमी ग्रुपतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. २३ ःसंगीतप्रेमी ग्रुपतर्फे ‘पंछी सूर में गाते है’ या संगीत मैफलीत वृत्तपत्र विक्रेत्यांचे नुकतेच सत्कार करण्यात आले. सुरेल स्वर साजात हौशी गायकांनी गायलेल्या गीतांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्ठाला जणू सलाम केला. यावेळी गुलाब पुष्प व सन्मान पत्र देऊन वृत्तपत्र विक्रेत्यांना गौरवण्यात आले.
येथील गायकांचा संगीत प्रेमी ग्रुप तर्फे संगीत ‘पंछी सूर मे गाते है’ ही संगीत मैफल शाहू स्मारक भवनात घेण्यात आली. यावेळी गायकांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. या मैफलीत हिंदी - मराठी चित्रपटातील सदाबहार गीते गायकांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केली. वृत्तपत्र विक्रेत ऊन, वारा, थंडी सोसत वर्षानुवर्षे वृत्तपत्र घरोघरी देण्याचे काम करतात. विक्रेते वृत्तपत्र वाटप करताना जेथे पाण्याचे नळ सुरू असलेले दिसेतात तेथे पाण्याचे नळ बंद करतात. पाण्याची बचत करण्यास हातभारही लावतात. यातून त्यांची सामाजिक जाणीवही दिसून येते. वृत्तपत्र सकाळीच घरोघरी पोहचते. यातून ज्ञार्नाजन घडत आहेत. भाषे विषयी आस्था वाढते, अशी ज्ञान मेजवाणी देण्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान मोलाचे आहे. याचीच दखल घेऊन वृत्तपत्र विक्रेत्यांचे सत्कार करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष अमर कांबळे, उपाध्यक्ष सुजित दिंडे, सचिव राजू अपराध यांच्या हस्ते विक्रेत्यांचे सत्कार झाले.
यात राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ते, स्वाभिमानीचे कार्याध्यक्ष परशूराम सावंत, संभाजीनगर डेपोचे राजाराम पाटील, शहराध्यक्ष रवी लाड, राजारामपुरीचे असीफ मुल्लाणी, संभाजीनगरचे नामदेव गोंधळी, संघटक रमेश जाधव, कावळा नाका कृष्णात शहापुरे, अंकूश परब, सचिव सुरेश ब्रम्हापुरे, संचालक सतिश दिवटे, सागर रुईकर, धनंजय शिराळकर, महेश बोडके यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com