बुध्दपोर्णिमा

बुध्दपोर्णिमा

85506
पोहाळे : जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समितीतर्फे येथील बौद्ध लेणी परिसरात बुद्ध जयंती साजरी झाली.

शांती संदेशांतून गौतम बुद्धांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : अहिंसा, शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांची जयंती बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज उत्साहात झाली. व्यक्तिगत व सामाजिक जीवन शांततामय व्हावे, शातंतेतून आरोग्य संपन्नतेकडे जाणारी वाट सुखकर व्हावी त्यासाठी ध्यान धारणा, प्रार्थनेचा मार्ग अवलंबवा असा निश्‍चय असंख्य अनुयायांनी केला. गौतम बुद्धांच्या प्रतिमेला वंदन केले. संदेशाचे वाचन केले. विविध संस्था, संघटना, पक्षांतर्फे बुद्धपौर्णिमा साजरी करण्यात आली.

‘बौद्ध लेण्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे’
मसाई पठारावरील बौद्ध लेणी व गुहा व कुशिरे-पोहाळे येथे बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी. एस. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बुद्ध जयंती झाली. जिल्ह्यातील बौद्ध लेण्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दरम्यान, कोल्हापूर बौद्ध अवशेषाची ३० वर्षे या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. २६) श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार असल्याचे समितीने जाहीर केले. यावेळी मसाई पठार बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्‍व विभाग, राज्य शासन, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री आदींनी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले. प्रथम सामूहिक त्रिशरण, पंचशील भन्ते पटीसेन, भन्ते करुणनिधी (मुंबई), अनिल कांबळे, संपत घोलप, रमेश कांबळे, प्रविण कांबळे, बुद्धिष्ठ सोसायटी ऑफ इंडियाचे राजेंद्र भोसले, उत्तम कांबळे, अर्जुन कांबळे आदींच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी बापूसाहेब कांबळे, अजित कांबळे, विद्या कांबळे, देवदास बानकर, सुजित समुद्रे, व्यकंप्पा भोसले, वसंत लिंगणुरकर, भारत सोरटे उपस्थित होते.


साळवे प्रतिष्ठापन
क्रांतीगुरू लहुजी (वस्ताद) साळवे प्रतिष्ठानतर्फे शास्त्रीनगर येथील केएमटी वर्कशॉप समोरील बुद्ध गार्डन येथील सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ॲड. दत्ताजीराव कवाळे यांच्या हस्ते पुष्प अर्पण केले. यावेळी ‘रिपाइं’च्या रूपा वायदंडे, गजानन कुरणे, युवा सेनेचे शहर समन्वयक बंडा लोंढे, चिखलीचे ग्रामपंचायत सदस्य विश्‍वनाथ भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, सरदार आमशीकर, पुष्पा नलवडे, प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य, प्रतिभा सावंत, अजित कांबळे, शोभा कांबळे, अश्‍विनी कांबळे उपस्थित होते.

धम्म चक्र बुद्ध विहार
धम्म चक्र बुद्ध विहारतर्फे साळोखे पार्क भारतनगर येथील महिलांच्या हस्ते गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी धम्मचक्र बुद्ध अध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांनी धम्मदेशना देऊन बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. घोडेराव म्हणाले, ‘‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून भारतनगर साळुंखे पार्क येथे तीन मजली धम्मचक्र बुद्ध विहाराचे बांधकाम सुरू आहे. दोन महिन्यांमध्ये या धम्मचक्र बुद्ध विहाराच्या वास्तूचे उद्‍घाटन होणार आहे.’’ या वेळी अनिल जाधव, विनोद शिंदे, गणेश जाधव, संग्राम सोनवणे, रोहन वाघमारे, सदा सांगावकर, डॉ. सिद्धार्थ घोडेराव, धम्मपाल घोडेराव, तात्या गायकवाड, सुरेश गायकवाड, मीरा घोडेराव, शकुंतला जाधव, तेजल घोडेराव व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्था
जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेत संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पूजन झाले. राहुल माणगावकर, रघुनाथ कांबळे यांनी बुद्ध वंदना सादर केली. रघुनाथ मांडरे, प्रकाश पोवार, नंदकुमार कांबळे, दिलीप वायदंडे, संजय कांबळे, योगेश वराळे, बापू कांबळे उपस्थित होते.


वेताळ गार्डनमध्ये अभिवादन
शिवाजी पेठेतील वेताळ गार्डन येथील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी धम्म ध्वजरोहवंदन, त्रिशरण, पंचशील बुद्ध वंदना, धम्मदेशना, धम्मपालन गाथा पठण करण्यात आले. या वेळी भारती पाटील, निवास सूर्यवंशी, ॲड. राहुल सडोलीकर, अमोल कुरणे, संभाजी चौगुले, संचिता ठोंबरे, रवींद्र कुरणे उपस्थित होते.

07863

जयंती समितीच्या माध्यमातून
एकत्र काम करण्याची गरज : मौर्य
कंदलगाव : बहुजन समाजाला बुद्धांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पटत आहेत. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीत मध्यवर्ती जयंती समितीच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांनी व्यक्त केले.
बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघातर्फे गौतम बुद्ध यांची जयंती शास्त्रीनगर बुद्ध गार्डनमध्ये झाली. या कार्यक्रमात मौर्य बोलत होते. यावेळी डॉ. धुमाळे, डी. जी. भास्कर, देवदास बानकर, संजय गुदगे, उषा गवंडी, अनिता गवळी आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अरुण धुमाळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन झाले. मौर्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमेस डी. जी. भास्कर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले.
सुखदेव बुध्याळकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी रघुनाथ मांडरे, दयानंद शेडगे, रमेश कांबळे, विलास भास्कर, अजय डोंगरे, सौरभ बुध्याळकर, पंकज आठवले, प्रवीण बनसोडे, सुरेश नागटिळे, संतोष हिरवे, संजय कांबळे, वैभव प्रधान, नामदेव कोथळीकर, सुकुमार कोठावळे, नामदेव माने, के. टी. सडोलीकर, अनिता समुद्रे, शोभा बुध्याळकर, ज्योती बुध्याळकर, उज्‍ज्वला चंदनशिवे, पूनम बानकर, ज्योती आठवले, कविता महाजन, ज्योती डोंगरे, मीना कांबळे, वैशाली लिंगनूरकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com