नातेवाईकांना फोन करून तरूणाची पंचगंगेत उडी

नातेवाईकांना फोन करून तरूणाची पंचगंगेत उडी

फोटो ः85509 ( फोटो पेस्टेड)

नातेवाईकांना फोन करून तरूणाची पंचगंगेत उडी
मृतदेह मिळाला ः मोबाईल चोरीस गेल्याने होता तणावाखाली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः आपण आत्महत्या करीत असल्याने काही नातेवाईकांना सांगून रामेश्वर बाबुराव थोलंबरे (वय २६, मूळ रा. शेगांव, बुलढाणा, सध्या रा. बालगोपाल तालीमनजीक) याने बुधवारी पंचगंगेत उडी घेतली होती. गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीनजीक पाण्यात मिळाला. बिंदू चौक सबजेल रोडवर किचेन विक्री करणाऱ्या रामेश्वरचा मोबाईल चोरीस गेल्याने तो दोन दिवस अस्वस्थ होता. त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे नातेवाईकांना सांगितले.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, रामेश्वर थोलंबरे हा मूळचा शेगांव येथील राहणारा होता. कामानिमित्त तो कोल्हापुरात आला होता. लाकडी अक्षरांचे किचेन बनवून तो विकत होता. त्याच्याकडील किचेनला मागणी असल्याने त्याने पुणे, लोणावळा, सातारा अशा ठिकाणी त्याचा पुरवठा सुरू केला होता. तीन वर्षांपूर्वी वडीलांचे निधन झाल्याने त्याने आईलाही कोल्हापुरात आणले होते.
बुधवारी सायंकाळी रामेश्वरने एका मित्राला फोन करुन आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. यानंतर मित्रांनी त्याचा शोध घेतला असता, त्याची दुचाकी पंचगंगा स्मशानभूमीजवळ आढळली. याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबविली. मात्र गुरुवारी सकाळी रामेश्वरचा मृतदेह नदीपात्रामध्ये आढळला. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली. उत्तरिय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्याचा मोबाईल जुना राजवाडा परिसरातून चोरीस गेला होता. त्याच्या कामाची सर्व माहिती, माल विकलेले हिशेब, देणे-घेण्याचे व्यवहार याची माहिती मोबाईलमध्येच असल्याने तो काहीसा तणावात होता असे त्याच्या मित्रांनी सांगितले.
रामेश्वरने आईचा मोबाईल घेऊन बुधवारी सायंकाळी पंचगंगा पूल गाठला. मामेभावासह काही मित्रांना त्याने पंचगंगेत उडी मारत असल्याचे सांगितले. काही वेळातच त्याचे काही नातेवाईक पंचगंगा नदीजवळ पोहोचले. पण त्याने फोन केलेला नंबरही बंद होता.

नातेवाईक बुधवारी दाखल
पंचगंगा नदीकाठावर पहाटेपासून रामेश्वरचे मित्र आले होते. सकाळी आठच्या सुमारास एक मृतदेह स्मशानभूमीसमोर पाण्यात तरंगताना मिळाला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला असता तो रामेश्वरचाच असल्याने नातेवाईकांनी ओळखले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com