हॉकी स्टेडियम चौकातच गळती-

हॉकी स्टेडियम चौकातच गळती-

86727
कोल्हापूर : हॉकी स्टेडियमच्या चौकात बुधवारी सायंकाळी पाणी गळती उद्‍भवली. त्यामुळे चौकात पाणी पसरले होते.


हॉकी स्टेडियम चौकात गळती
रस्त्यावर पाणीच पाणी; शेंडा पार्क चौकातही समस्या, आज दुरुस्ती करणार
कोल्हापूर, ता. २९ : हॉकी स्टेडियम चौकातच आज सायंकाळी जलवाहिनीला मोठी गळती उद्‍भवल्याने चौकातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. त्याचप्रमाणे शेंडा पार्क चौकातही गळती उद्‍भवली आहे. त्याची दुरुस्ती उद्या (ता. ३०) केली जाणार आहे.
गेल्या आठवड्यापासून थेट पाईपलाईन योजनेच्या वीज वाहिन्यांवर झाडे पडत असल्याने सोमवार व मंगळवारी सलग दोन दिवस उपसा बंद राहिला. त्यातून शिवाजी पेठ, मंगळवार पेठ भागांत कमी दाबाने पाणी आले, तर काही भागांत पाणी बंद राहिले. यामुळे नागरिक वैतागले होते. बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत झाला. सायंकाळी स्टेडियमच्या चौकात अचानक रस्त्याखालून पाणी बाहेर पडू लागले. त्याचे प्रमाण मोठे असल्याने काही क्षणातच चौकात पाणीच पाणी झाले. चौकातून वितरण नलिका टाकली आहे. त्यातून गळती उद्‍भवली असण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे. कर्मचाऱ्यांनी मुख्य वाहिनीवरून वितरीत केल्या जाणाऱ्या पाईपचे पाणी कमी केले. त्यामुळे गळतीचे प्रमाण कमी झाले. उद्या (ता. ३०) सकाळीही या वितरण पाईपवरून पाणी दिले जाते. त्यावेळीही गळती सुरू होण्याची शक्यता आहे.
यामुळे हॉकी स्टेडियमजवळील सर्व परिसर, रामानंदनगर, जरगनगर या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. याबरोबरच शेंडा पार्क चौकातही गळती उद्‍भवली. सुभाषनगर पंपिंगहून जाणाऱ्या पाईपलाईनला गळती उद्‍भवली आहे. या दोन्ही ठिकाणची गळती उद्या दुरुस्त केली जाणार आहे. दुरुस्ती लांबली तर अवलंबून भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे.
--------------------
चौकट
पाण्यासाठी नागरिक कळंबा फिल्टरवर
गेल्या आठवड्यापासून थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद सुरू होत असल्याने भागात व्यवस्थित पाणी दिले जात नाही. त्यामुळे वैतागलेले नागरिक आज सकाळी कळंबा फिल्टर हाऊसवर आले होते. पाणी द्या, असे सांगत मोठा गोंधळ घातला. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com