वाहतूक कोंडीवर बहुमजली पार्किंगचा उतारा

वाहतूक कोंडीवर बहुमजली पार्किंगचा उतारा

ajr302.jpg....
86874
आजरा : शहरात झालेले वाहनांची कोंडी (छायाचित्र : श्रीकांत देसाई, आजरा)
-------------------------
वाहतूक कोंडीवर बहुमजली पार्किंगचा उतारा
जाणकारांचे मत : अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतूक समस्या बिकट, बाह्यवळण रस्त्याची गरज
रणजित कालेकर : सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २ : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात व बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनत चालला आहे. अस्ताव्यस्तपणे रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची समस्या बिकट बनली आहे. बाह्यवळण रस्त्याबरोबर आजऱ्यात बहुमजली पार्किंगची व्यवस्था तयार केल्यास वाहतूक कोडींला उतारा मिळेल, असे जाणकार सांगतात.
शहरातील वाहतूक समस्या सध्या नगरपंचायत व पोलिस प्रशासनासमोर डोकेदुखीचा विषय झाला आहे. संकेश्वर-बांदा महामार्गामुळे थोडाफार वाहतुकीचा ताण हलका होत असला तरी वाहतुकीची समस्या कायम आहे. शहराचा विस्तार होत असून शहरालगत उपनगरे वसत आहेत. मूळ शहरात घरांचे इमारतीमध्ये रुपांतर होत आहे. पण रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. आजऱ्याची मुख्य बाजारपेठ व महागाव मार्गावर तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शुक्रवारच्या आठवडा बाजारादिवळी वाहतूक कूर्मगतीने सुरू असते. आजऱ्यातून गोव्याला जाणाऱ्या मार्गावर तर मोठी रहदारी आहे. दिवसाला हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. हे सर्व पाहता शहरातील वाहतूक कोंडी व पार्किंग व्यवस्थेसाठी पर्याय काढण्याची गरज आहे. यासाठी पार्किंगची व्यवस्था लावणे व बाह्यवळण रस्ता तयार करणे ही काळाची गरज आहे. मध्यंतरी नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने पार्किंगबाबत नियम घालून व्यवस्था तयार केली होती. सम विषम तारीखला दुचाकीचे पार्किंगबरोबर सार्वजनिक जागांवार वाहन तळ उभारले होते. नियम मोडणाऱ्यांची वाहने जप्त करून दंड केला जात होता. पण हा प्रयोग तितका यशस्वी झाला नाही. यापाठीमागे अनेक त्रुटी दिसून आल्या. पण सध्या शहरातील बिकट होणाऱ्या वाहतूक समस्येवर मार्ग काढण्याची गरज आहे. शासकीय व अन्य कामांसाठी शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची वाहने कुठे लावायची हा प्रश्न आहे. शहरात ही वाहनांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. वाहतुकीची कोंडी होताना दिसते. त्यामुळे पुणे, मुंबई किंवा जवळचे नृसिंहवाडीच्या धर्तीवर येथे बहुमजली पार्किंग व्यवस्था उभा करणे गरजेचे असल्याचे जाणकार व तज्ज्ञ सांगतात.
--------------------
बाह्यवळण, रिंगरोडची आवश्यकता
आजरा शहरालगत रिंगरोड तयार केल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल. त्याचबरोबर आजरा-महागाव रस्त्याला सावरवाडीतून बाह्यवळण (बायपास) रस्ता तसेच संकेश्वर-बांदा महामार्गाचा बाह्यवळण (बायपास) रस्ता उभा करणे शक्य आहे. त्यामुळे कोंडी दूर होण्याबरोबर शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल.
----------
* चौदा हजार वाहनांची ये-जा
एका संस्थेने तीन वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात संकेश्वर-आजरा-बांदा महामार्गावरून दिवसभरात १४ हजार वाहनांची ये-जा असते अशी नोंद घेतली आहे. आता यामध्ये मोठी वाढ झाली असावी. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com