वीज कनेक्शनची वीज बिले भरा एकाच क्लिकवर

वीज कनेक्शनची वीज बिले भरा एकाच क्लिकवर

वीज बिले भरा आता एकाच क्लिकवर

महावितरणची नवी सुविधा; शासकीय कार्यालय, खासगी कंपन्यांना होणार लाभ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १ ः राज्यात ठिकठिकाणी अनेक वीज जोडणी आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या विविध सरकारी खाती आणि खासगी कंपन्यांसाठी महावितरणने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार वेळेत बिल भरल्यास संबंधितांना एक टक्का सवलत मिळणार आहे. महावितरणने उपलब्ध केलेल्या सुविधेमुळे अनेक ठिकाणी बिले वेळेत भरता येतील तसेच वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईतून सुटका होणार आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या सूचनेनुसार बिलिंग आणि माहिती तंत्रज्ञान या विभागांनी संयुक्तपणे नवी सुविधा तयार केली आहे. राज्यामध्ये पोलिस, ग्रामविकास, पाणीपुरवठा अशा विविध शासकीय खात्यांना तसेच मोठ्या खासगी कंपन्यांच्या शाखा इतरत्र आहे. त्यांच्या विविध कार्यालयांची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची बिले भरण्याची वेगवेगळी अंतिम मुदत असते, त्यासाठी आर्थिक तरतूद असूनही वेळेत बिले भरली जात नाहीत, त्यामुळे दंड आणि व्याज द्यावे लागते. तसेच कधी कधी बिल भरले नसल्याने कनेक्शन तोडले गेल्याने कार्यालयात अंधार होतो.
या समस्येवर उपाय म्हणून महावितरणने उपलब्ध केलेल्या सुविधेमुळे संबंधित सरकारी खात्याला किंवा कंपनीला त्यांच्या मुख्यालयात बसून राज्यातील विविध ठिकाणच्या शाखांतील वीज कनेक्शनसाठी आलेली बिले आणि त्यांची अंतिम मुदत याची माहिती मिळेल. तसेच माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक बिल वेळेत भरता येईल. वेळेत भरलेल्या बिलावर एक टक्का सवलतही मिळेल. याखेरीज कागदी बिलाऐवजी इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारल्यामुळे प्रत्येक बिलामागे दहा रुपये सवलत आणि डिजिटल पेमेंट केल्यामुळे कमाल पाचशे रुपये सवलतही मिळेल. या सुविधेसाठी महावितरणच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयात माहिती मिळेल.
...
चौकट
असाही होईल लाभ
महावितरणने सरकारी विभाग आणि खासगी कंपन्यांना उपलब्ध केलेल्या सुविधेमुळे ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ संकल्पनेला बळ मिळेल. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनी याचा लाभ घेऊ शकतात. यामुळे त्यांना आर्थिक व्यवस्थापन करणे सोपे होईल. त्यांच्या अंतर्गत विविध कार्यालयांत होणारा विजेचा वापर आणि त्यावर होणारा खर्च याची माहिती सहजपणे एकत्रित मिळेल तसेच बिलाबाबत काही तक्रार असल्यास तीही सहजपणे ऑनलाईन करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com