एसटी  वर्धापन दिन

एसटी वर्धापन दिन

एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त
प्रवाशांना साखर-पेढे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः एसटी महामंडळाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मध्यवर्ती बसस्थानक तसेच संभाजीनगर बसस्थानक येथे प्रवाशांना साखर-पेढे वाटण्यात आले. संभाजीनगर आगारात ९७ व्या वर्षी एसटीने प्रवास करणाऱ्या कृष्णात पाटील या ज्येष्ठ प्रवाशाच्या हस्ते केक कापण्यात आला, तर मध्यवर्ती बसस्थानकात विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते एसटी बसचे पूजन करण्यात आले.
मध्यवर्ती बसस्थानकावरील कार्यक्रमास यशवंत कानतोडे, आगार प्रमुख अनिल म्हेतर, मल्लेश विभुते, संकेत जोशी, दीक घारगे आदी उपस्थित होते.
संभाजीनगर आगारात आगारप्रमुख शिवराज जाधव, लेखाधिकारी मानिनी तेलवेकर, मुख्याध्यापक एच. आर. सत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापनदिन साजरा झाला. ज्येष्ठ प्रवासी कृष्णात पाटील (रा. कोपार्डे, ता. करवीर) हे गावातून कोल्हापुरात व कोल्हापुरातून गावात यात्रा -जत्रा किंवा घरगुती कार्यक्रमासाठी गावोगावी एसटीने प्रवास करतात. एसटीची सेवा सुरू झाल्यापासून ते एसटीचे प्रवासी आहेत. एसटी महामंडळावर विश्वास ठेवून नियमितपणे एसटीने प्रवास केल्याबद्दल कृतज्ञतेचा भाग म्हणून एसटी महामंडळाने त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
रंकाळावेश बसस्थानकात केळीची पाने, नारळाच्या फांद्या लावून सजावट करण्यात आली, तसेच रांगोळी काढण्यात आली. पहिल्या फेरीतील बसची सजावट करून सजविलेल्या बसचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानकप्रमुख प्रशांत गुरव, कार्यशाळा अधीक्षक राहुल फगरे, वाहतूक निरीक्षक कुंदन भिसे, राहुल घाटगे, दिलीप गावडे, अमित तावडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com