आई-वडीलांची स्वप्ने पूर्ण करा

आई-वडीलांची स्वप्ने पूर्ण करा

gad11.jpg
87171
गडहिंग्लज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व हसन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी सतीश पाटील, अनुप पाटील, सचिन देसाई, के. बी. पोवार, आदी उपस्थित होते.
---------------------------
आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करा
पालकमंत्री हसन मुश्रीफ : गडहिंग्लजला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : आई-वडिलांनी प्रचंड काबाडकष्ट करून, अनंत खस्ता खाऊन तुम्हाला या यशापर्यंत पोहोचविले आहे. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा. त्यांच्या प्रयत्नांना पात्र राहा. आवडीच्या क्षेत्रात करिअर करा आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करा, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व हसन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे गडहिंग्लज शहरासह कडगाव-गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार झाला. याप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. कडगाव मार्गावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर हा कार्यक्रम झाला.
कडगाव येथील १०० विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, हरुण सय्यद, सिद्धार्थ बन्ने, बाळासाहेब देसाई-मंचेकर, सदानंद पाटील, रश्मीराज देसाई, संतोष पाटील, सचिन देसाई, अशोक कुरळे, अशोक खोत, पृथ्वीराज पाटील, संजय गाडे, महादेव मोरे, अनुप पाटील, आनंदा पाटील, उषा मांगले, शर्मिली पोतदार, आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष गुंडू ऊर्फ रामगोंडा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. आशपाक मकानदार यांनी सूत्रसंचालन केले. माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com