क्लब फूटवरील उपचारासाठी ‘सीपीआर’ ठरतेय वरदान

क्लब फूटवरील उपचारासाठी ‘सीपीआर’ ठरतेय वरदान

क्लब फूटवरील उपचारासाठी
‘सीपीआर’ ठरतेय वरदान
जिल्ह्यातील १५४ बालकांवर उपचार
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : बाळाच्‍या पायात जन्मजात पाय वाकडेपणा (क्लब फूट) असल्यास पालकही हवालदिल होतात. बाळाचे चालणेच अडथळ्यांचे बनते, अशी समस्या लहानपणीच योग्य उपचाराने बरी होते. अशी मुले इतर मुलांप्रमाणे चालू, फिरू, खेळू शकतात. अशी उपचार सेवा सीपीआर रुग्णालयात, क्युअर क्लब फूट महाराष्ट्र स्वयंसेवी संस्थेतर्फे मोफत उपचार मिळत आहेत. जिल्हाभरातील १५४ वर बालकांवर सध्या उपचार सुरू आहेत. आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकांसाठी मोफत सेवा वरदान ठरते आहे.
वाकडे पाय झालेल्या बालकांच्‍या तपासण्या सीपीआर रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागात केल्या जातात. तज्‍ज्ञ डॉक्टर निदान करून उपचाराची दिशा ठरवितात. त्यानुसार बाळाच्या पायात दोन ते चार महिन्यांसाठी प्लास्टर घातले जाते. त्यानंतर प्लास्टर काढून विशेष बूट तीन ते चार वर्षे वापरावे लागतात. ही सेवा नि:शुल्क आहे.
लक्षणे दिसताच बाळाला वेळीच रुग्णालयात आणावे लागते. प्लास्टरने पायांना बोटापासून मांडीपर्यंत प्लास्टर केले जाते. जास्तीतजास्त पाच ते आठ वेळा प्लास्टर केले जाते. यातून बाळाचे पाय समांतर रेषेत येण्यास मदत होते. यात काही मुलांच्या पायात गंभीर स्वरूपाचा वाकडेपणा असेल तर त्यासाठी टिनाटॉमीचे उपचार करावे लागतात. बऱ्याच मुलांना शेवटच्या उपचारावेळी टिनाटॉमी उपचारांची गरज पडते. यात बाळाच्या पायाच्या टाचेतील विशिष्ट शीर छोटी शस्त्रक्रिया करून कापली जाते. त्यानंतर बाळाला नवीन प्लास्टर लावले जाते. हे प्लास्टर तीन आठवडे ठेवावे लागते. बाळाला विशेष बूट दिले जातात. ते पुढे तीन ते चार वर्षे वापरावे लागतात, असे उपचार होतात.
-----------------
कोट
लहान मुलांत जन्मजात पाय वाकडे असण्याची समस्या असते. त्यांच्यावर ‘सीपीआर’मधील अस्थिरोग विभागात उपचार होतात. तज्‍ज्ञ डॉक्टरांकडून प्लास्टर घातले जाते. पुढे बूट वापरायला दिले जातात. यातून पायात होणाऱ्या बदलांचे निदान केले जाते. या उपचारात सातत्य असणे महत्त्‍वाचे आहे. हे उपचार मोफत असल्याने पालकांनी बाळांना डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेत नियमित उपचाराला आणले पाहिजे. वेळीच उपचार झालेल्या मुलांचे पाय सरळ होऊ शकतात.
- डॉ. राहुल बडे, अस्‍थिरोगतज्‍ज्ञ, सीपीआर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com