गड-रक्तदान शिबीर

गड-रक्तदान शिबीर

फोटो क्रमांक : gad13.jpg

87230
‘रक्तदान करा, हेल्मेट मिळवा’ला प्रतिसाद
गडहिंग्लज पोलिसांकडून शिबिराचे आयोजन : ६७५ जणांनी केले रक्तदान

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ३ : येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व गडहिंग्लज पोलिस ठाण्यातर्फे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. ‘रक्तदान करा आणि मोफत हेल्मेट मिळवा’ उपक्रमाला गडहिंग्लजकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल ६७५ जणांनी रक्तदान केले. पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये दिवसभर शिबिर चालले.
येथील पोलिस ठाण्याचा पदभार परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांच्याकडे आहे. संकेश्वर-बांदा महामार्ग झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हर्षवर्धन यांनी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू केली. यातून शहराला वगळले आहे. पोलिसांनी वाहनधारकांवर कारवाई करीत आतापर्यंत तीन लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. तर दुसरीकडे हेल्मेट वापराबाबत जनजागृतीही केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिर घेतले.
वास्तविक शिबिर सुरू करण्याची वेळ सकाळी दहाची होती. पण, रक्तदाते मोठ्या संख्येने आल्याने अर्धा तास आधीच शिबिराला सुरवात करावी लागली. जडियसिद्धेश्वर आश्रमाचे महंत सिद्धेश्वर महास्वामीजी, पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांच्या उपस्थितीत शिबिराला प्रारंभ झाला. दिवसभर दात्यांची गर्दी होती. रक्तदानासाठी रांगा लागल्या होत्या. नियोजनानुसार सायंकाळी पाचपर्यंत शिबिर चालणार होते. पण, रक्तदाते थांबून असल्याने सातपर्यंत शिबिर चालले. दरम्यान, प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र आणि हेल्मेट देण्यात आले. पोलिसपाटील, होमगार्ड, पोलिस मित्र, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हे शिबिर झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com