म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहनपर योजना राबविणार

म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहनपर योजना राबविणार

अरुण डोंगळे यांचा फोटो वापरणे...
...

म्हैस दूधवाढीसाठी
प्रोत्साहनपर योजना राबविणार
गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे : हिरक महोत्सवी वर्ष संकल्पपूर्तीचे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. ३१: ‘जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघात सत्तांतरानंतरचे तिसरे वर्ष हे हिरक महोत्सव वर्ष आहे. हे वर्ष संकल्पपूर्तीचे आणि दूध उत्पादकांचे उत्कर्ष करणारे ठरले आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर दूध संकलनाचा १८ लाखांचा टप्पा पार केला आहे. गोकुळकडे शुद्ध व दर्जेदार दूधपुरवठा हाोण्यासाठी म्हैस दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना राबविणार असल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली. डोंगळे यांच्या अध्यक्षपदाची वर्षपूर्ती झाली आहे. यानिमित्ताने त्यांनी ही माहिती दिली.

अध्यक्ष डोंगळे म्हणाले, ‘संघाकडून यावर्षी म्हैस दूध खरेदीसाठी ५८ रुपये ५४ पैसे व गाय दुधासाठी ३८ रुपये ३७ पैसे (जादा दर व दरफरकसह) दर दिला आहे. हा दर राज्यातील सर्वात जास्त गाय दूध खरेदी दर आहे. गोकुळकडून गाय दूध उत्पादकांना शासनापेक्षा सहा रुपये जादा दर दिला जात आहे. शासनाकडून गाय दूध उत्पादकांना दिले जाणारे पाच रुपयेप्रमाणे १४ कोटी ५८ लाख रुपये अनुदान मिळाले आहे.’
...

* घेतलेले धोरणात्मक निर्णय

- ‘गोकुळ श्री’ पुरस्काराची रक्कम ३० हजारांऐवजी रुपये १ लाख रुपये
- जातीवंत म्हैस खरेदी ३० हजारऐवजी ४० हजार अनुदान
- कर्मचाऱ्यांच्यासाठी पाच हजार रुपये वेतनवाढीचा करार
...
* भविष्यातील योजना...
- गोकुळ विस्तारासाठी भोकरपाडा-खोपोली येथे १५ एकर जागा खरेदी प्रस्तावित
- गडमुडशिंगी येथे आयुर्वेदिक औषध कारखाना निर्मिती
- नवी मुंबई वाशी येथे १५ टन क्षमतेचा दही प्रकल्प उभारणे
- ‘गोकुळ केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com