संगीत संध्या कार्यक्रम

संगीत संध्या कार्यक्रम

87229
संगीत संध्या मैफलीत
हौशी गायकांचे सुरेल गायन
कोल्हापूर , ता. १ ः फुलोंसा चेहरा तेरा... भवरे की गुंजन... चला जाता हूं... या अशा विविध हिंदी, मराठी गीते हौशी गायकांनी आपापल्या सुरेल स्वर साजात सादर करीत रसिकांची मने जिंकली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने संगीत संध्याही संगीत मैफल झाली. करोओके ट्रॅकवर गायकांनी गायली.
नोकरी व्यवसाय व घर-संसार सांभाळूनही गाणी गाण्यांची हौस जपलेल्या हौशी गायकांनी गायन केले. त्यासाठी रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या मैफलीत ओ हसिना झुल्फोवाली... आज मौसम बडा... सांज ये गोकुळी... अशी सुरेल गीतांनी रसिकांना ताल धरायला लावला. यापाठोपाठ ‘ये समा ही समा है प्यार का व जब छाये तेरा जादू स्वरूपा कुलकर्णी यांनी गायलेल्या गीतांनी मैफलीची रंगत वाढवली या पाठोपाठ मैफलीत बहरला मधू मास.... या जन्मावर शतदा प्रेम करावे... दिस चार झाले मन... सांज ये गोकुळी... या मराठी गीतांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी, शामराव जोशी, प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातुरकर, अभिनेते नितिन कुलकर्णी, उद्योजक भालचंद्र लाटकर, मुरलीधर चिपडे, अनंत जोशी, प्रसाद जमदग्नी, विवेक जोशी, अभयकुमार नेर्लेकर, देवीदास सबनीस, रेणु खानोलकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com