‘केडीसीए’ च्या अध्यक्षपदी संभाजीराजे छत्रपती

‘केडीसीए’ च्या अध्यक्षपदी संभाजीराजे छत्रपती

87267
87268

‘केडीसीए’ च्या अध्यक्षपदी
संभाजीराजे छत्रपती यांची निवड

अभिजीत भोसले उपाध्यक्ष; तेरा संचालक बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १ ः येथील जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) अध्यक्षपदी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची, तर उपाध्यक्षपदी अभिजीत भोसले यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष चेतन चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली निवडी आज जाहीर झाल्या. छत्रपती शिवाजी स्टेडियममधील संस्थेच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी महेशराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
एकूण तेरा संचालकांची बिनविरोध निवड झाली. अन्य कार्यकारिणीत शीतल भोसले (सचिव), अजित मुळीक (सहसचिव), कृष्णात धोत्रे (सहसचिव), मदन शेळके (सहसचिव), तर सदस्यपदी चेतन चौगुले, रमेश हजारे, केदार गयावळ, जनार्दन यादव, रोहन भुईंबर, राजेश केळवकर, स्वीकृत सदस्य म्हणून किरण रावण (ता. करवीर), साद मुजावर (कागल तालुका), संजय पाठारे, नितीन पाटील, रहीमखान (क्लब प्रतिनिधी) आणि प्रथमच महिला प्रतिनिधी म्हणून ज्येती काटकर यांचीही बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे, नंदकुमार बामणे आदी उपस्थित होते.
..........
कोट
माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ‘केडीसीए’ चे स्वमालकीचे मैदानासाठी प्रयत्नशील राहणार आहे. खेळाडूंना इतर पायभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय कोल्हापुरात जास्तीत जास्त प्रथम श्रेणी सामने घेण्यासाठी प्रयत्नशील राहू.
- संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com