अभियंता जखमी

अभियंता जखमी

चंदगड येथे मोटारीच्या धडकेत
वीज वितरणचे अभियंता जखमी
चंदगड, ता. १ ः वीज वितरण कंपनीच्या येथील कार्यालयातील सहायक अभियंता विशाल गुरुप्रसाद लोधी (वय ४६) भरधाव मोटारीच्या धडकेत जखमी झाले. चंदगड ते चंदगड फाटा मार्गावरील पोलिस वसाहतीनजीक आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी मोटारीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोधी हे आपल्या दुचाकीवरुन (एमएच १४ डिआर ७६०२) चंदगडकडे येत असताना समोरून लाल रंगाची मोटार (एमएच ०९ बीएक्स ८३१०) भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने येऊन त्यांच्या दुचाकीला धडकली. यात त्यांच्या उजव्या पायाला, हाताला व नाकाला जखम झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, चालक न थांबताच निघून गेला. त्याचे नाव समजले नाही. मात्र, पोलिसांनी गाडी क्रमांकावरून गुन्हा दाखल केला आहे. सहायक अभियंता गुरुप्रसाद मोरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस नाईक देसाई अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com