डॉक्टराला झिका

डॉक्टराला झिका

खासगी रुग्णालयातील
एका डॉक्टरला
झिकाची लागण
कोल्हापूर, ता. १ ः शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरला झिकाची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून, झिकाचा संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत.
मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले ३६ वर्षीय डॉक्टर खासगी रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांना गेल्या चार दिवसांपासून ताप, थंडी अशी लक्षणे दिसत होती. उपचार घेऊनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांनी रक्त तपासणी करून घेतली. काही नमुने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. तेथून आलेल्‍या अहवालात संबंधित डॉक्टरांना झिकाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले आहेत. झिकाची लागण झालेल्या डॉक्टरांच्या संपर्कातील व्यक्तींच्या प्रकृतीवरही आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com