भाजीपाल्यासह टोमॅटो, दोडका, वांगी दरात वाढ

भाजीपाल्यासह टोमॅटो, दोडका, वांगी दरात वाढ

फोटो 87401

मेथी तीस, कोथिंबीर पन्नास रुपये पेंडी
शेती कामामुळे आवक घटली; दोडका, वांगी, फ्लॉवर, कोबी, गवारच्‍या दरात वाढ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : शेतकऱ्यांची पावसाअगोदरच्या कामांना गती आली आहे. भाजीपाला पिके नव्याने लागण करण्यासाठी धांदल उडाली आहे. त्यामुळे भाजीपाला आवक कमी आणि दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. मेथी तीस, कोथिंबीर अजूनही पन्नाशीतच आहे. अन्य भाज्यांचे दर कमीत कमी २० रुपये प्रति पेंडी झाले आहेत. दोडका, वांगी, फ्लॉवर गड्डा, कोबी, गवारची दरात वाढ झाली आहे. टोमॅटो तीस रुपये प्रतिकिलो असा दर पोहोचला आहे.
बाजारात गेल्या महिनाभरापासून कडक उन्हाळ्यामुळे भाजीपाला आवक घटली आहे. सातत्याने दर चढेच राहिले आहेत. मेथी, कांदापात, पोकळा, शेपू, कोथिंबीरीची घाऊक बाजारातच आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ विक्रीचे दर सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी कडधान्याकडे मोर्चा वळविला आहे. फळभाज्यांचेही दर भाजीपाल्याप्रमाणेच वाढले आहेत. पावसाने आणखी ओढ दिल्यास भाजीपाल्यासह फळभाज्यांचे दरही आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. मागील आठवड्यात दोनशे रुपये किलो असा भाव खाणारा लसूण या आठवड्यात १०० ते १६० रु. किलो असा उतरला आहे.
..........
चौकट
भाजीपाल्याचे दर
मेथी*३० ते ४० रु. पेंडी
पोकळा, पालक, करडा, कांदापात*२० ते २५ रुपये पेंडी,
.......
चौकट
फळ भाज्यांचे किलोचे दर
वांगी* ६० रु.
दोडका*६० ते ८० रु.
कोबी *२० ते ३० रु. नग
टोमॅटो*३० ते ४० रु.
ढब्बू मिरची*८० रु.
गवार*६० ते ७० रु.
घेवडा*८० ते १०० रु.
बिनीस*१०० ते १२०
भेंडी*४० रु.
हिरवा टोमॅटो*२० ते ३० रु.
गाजर*४० रु.
फ्लॉवर गड्डा*२० ते ४० रु.
पडवळ*१० ते २० रु. नग
ओली मिरची*८० ते १०० रु.
गवारी*६० ते ८० रु.
लिंबू *१० रु. तीन नग
.......
चौकट
तेल दरात किंचित वाढ
शेंगतेल *२०४ रु. किलो
सरकी *११६ रु.
(चार रुपयाने प्रतिकिलो दरात वाढ)
सोयाबीन*११२ रु. किलो
सूर्यफुल*१२० रु. किलो
खोबरेल *२४० रु. किलो.

चौकट
तोतापुरी, रायवळची आवक वाढली
रत्नागिरी, देवगड हापूसची आवक कमी झाली असून, तोतापुरी, रायवळ आंब्याची आवक वाढली आहे.
तोतापुरीची दर ६० ते ८० रु. किलो असा दर असला तरी काही ठिकाणी १५ ते २५ रु. नग अशा दराने विक्री होत आहे. रायवळी आंब्याचा ६० ते ९० रु. प्रतिडझन असा भाव आहे.

चौकट
अन्य फळांचे दर असे
चिकू * ६० रु.
पेरू (मोठा)* ८० ते १०० रु.
सफरचंद* १७० ते २६० रु.
डाळिंब*६० ते ८० रु.
कलिंगड- २० ते ६० रु. नग
........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com