ऊर्जा विषयक तज्ज्ञांसह ग्राहकांच्या प्रतिक्रीया (नवीन खासदारांकडून अपेक्षा)

ऊर्जा विषयक तज्ज्ञांसह ग्राहकांच्या प्रतिक्रीया (नवीन खासदारांकडून अपेक्षा)

ऊर्जा
...
वीजदर कमी करण्यासह सौरऊर्जेला सबसिडी मिळावी
.....................................
87413
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच वीजसुद्धा अत्यावश्‍यक गरज आहे. परंतु सध्या या सेवेचे व्यापारात रूपांतर करून ती खासगी कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे. ग्राहकांच्या हितासाठी वीज सेवेचा बाजार मांडू नये. यासाठी जनतेचे प्रतिनिधी या नात्याने खासदारांनी सरकारकडे भूमिका मांडून ग्राहकांना दिलासा द्यावा.
- प्रताप होगाडे, वीज तज्ज्ञ
...................................................................
87414
सर्वच घटकांना दिवसा वीज मिळते. परंतु जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना मात्र दिवसा वीज मिळत नाही. फक्त रात्रीचीच वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात पाणी द्यायला जावे लागते. यामुळे प्रसंगी जीवही धोक्यात येतो. दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जेचा चांगला पर्याय असून, तो स्वस्तही आहे. त्यामुळे खासदारांनी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाठपुरावा करावा.
- विक्रांत पाटील-किणीकर, संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन
..............................................................................
87415
वीजदर वाढले असून, ते ग्राहकांना न परवडणारे आहेत. ते कमी करण्यासाठी खासदारांनी सरकारकडे पाठपुरावा करावा. ग्राहकांना परवडणारी स्वस्त व माफक वीज म्हणजे सौरऊर्जा आहे. त्याला सरकारने जीएसटी न लावता जास्तीत जास्त सबसिडी देऊन त्याचा तळागाळात प्रचार करुन ग्राहकांना यासाठी प्रवृत्त करावे.
- मारुती पाटील, जिल्हा सचिव, कोल्हापूर इरिगेशन फेडरेशन
.........................................................................
87418

सध्या ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वीज गळतीचा अतिरिक्त बोजा पडत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. परदेशातील वीज वितरण व्यवस्थेतील तंत्रज्ञानाचा वापर करून वीज गळतीवर ठोस उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. यामध्ये खासदारांनी लक्ष घालून सरकारकडे पाठपुरावा करवा. तसेच प्रीपेड मीटरची सक्ती करू नये, वीज वितरण कंपनी कायद्यानुसार सेवा देत नाही, याकडेही लक्ष द्यावे.
- अरुण यादव, जिल्हाध्यक्ष, ग्राहक कल्याण फाउंडेशन
...................................................................
87420
सध्या विजेची झालेली दरवाढ सर्वसामान्यांसह सर्वच घटकांना न पेलवणारी आहे. ती कमी करून दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे खासदारांनी भूमिका मांडावी. तसेच सध्या प्री-पेड मीटरची सक्ती केली जात असून, ती अन्यायी आहे. ती रद्द करण्यासाठीही सरकारकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
- हर्षल खापणे, वीज ग्राहक
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com