बारावीच्या गुणपत्रिका आज मिळणार

बारावीच्या गुणपत्रिका आज मिळणार

बारावीच्या गुणपत्रिका
आज मिळणार
कोल्हापूर ः राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांचे उद्या, सोमवारी तीन वाजता विद्यार्थ्यांना वाटप होणार आहे. या गुणपत्रिकांसमवेत स्थलांतर प्रमाणपत्र देखील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. शिक्षण मंडळाने या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी ऑनलाईन जाहीर केला. जिल्ह्यातील ४९ हजार २१० विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिली. त्यांच्या गुणपत्रिका शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयातर्फे सोमवारी सकाळी अकरा वाजता कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप होणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे नियोजन काही महाविद्यालयांनी केले आहे. विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाविद्यालयांनी सुरु केली. त्यात प्राथमिक स्वरुपात विद्यार्थ्यांची नोंदणी करुन घेण्यात आली. आता मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात पडल्यानंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या पातळीवरील प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. दहावीच्या गुणपत्रिका साधारणतः या आठवड्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com