‘सुटा’तर्फे कार्यशाळेला प्रतिसाद

‘सुटा’तर्फे कार्यशाळेला प्रतिसाद

87409
...
सुधारित श्रेयांक पद्धती प्राध्यापकांनी स्वीकारावी

डॉ. आर. के. चव्हाण : ‘सुटा’तर्फे विद्यापीठात नवीन श्रेयांक पद्धतीवर कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : ‘नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमांची सुधारित श्रेयांक पद्धती प्राध्यापकांसाठी आव्हान असून, त्यांनी हे आव्हान स्वीकारावे,’ असे आवाहन ‘सुटा’चे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. के. चव्हाण यांनी केले.
‘सुटा’ जिल्हा शाखेतर्फे शिवाजी विद्यापीठामध्ये ‘पदवी अभ्यासक्रम व श्रेयांक पद्धती’ कार्यशाळेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. नवीन आणि अंतिम सुधारित पदवी अभ्यासक्रमांची श्रेयांक पद्धती शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये जूनपासून लागू केली आहे. नवीन श्रेयांक पद्धतीबाबत असलेल्या शंका व अडचणी निरसन करण्याच्या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली आहे, असेही प्रा. डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
विश्वस्त प्रा. सुधाकर मानकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हा कार्यवाह प्रा. डॉ. गजानन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेत विज्ञान, वाणिज्य, मानसशास्त्र विद्याशाखांच्या श्रेयांक पद्धतीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विज्ञान विद्याशाखेच्या श्रेयांक पद्धतीचे विश्लेषण प्रा. डॉ. आर. के. निमट (सातारा) यांनी केले. विज्ञान शाखेकडील श्रेयांक पद्धतीबाबत असलेल्या विविध शंकांचे निरसन केले. वाणिज्य विद्याशाखेच्या श्रेयांक पद्धतीवर प्रा. डॉ. आर. जी. कोरबू (कोल्हापूर) यांनी मार्गदर्शन केले.
मानव्यशास्त्र विद्याशाखेबाबत अधिसभा सदस्य प्रा. डॉ. प्रकाश कुंभार यांनी श्रेयांक पद्धतीमधील विविध स्तंभ, त्यातील विविध विषय, अध्यापन पद्धती, प्राध्यापकांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. मेजर व मायनर विषयांची विभागणी, विषयांची निवड, दोन श्रेयांकांच्याविषयांचे अध्यापन, ओपन इलेक्टिव्ह विषयांची विभागणी, विद्यार्थी प्रवेश, कौशल्य वृद्धी अभ्यासक्रमबाबत प्रा. कुंभार यांनी ‘टीप्स’ दिल्या. चौथ्या सत्रामध्ये प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह प्रा. ए. बी. पाटील होते.
प्रा. डॉ. सर्जेराव पद्माकर, प्रा. विश्वास नांगरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सयाजी पाटील, प्रा. सर्जेराव जाधव, प्रा. डॉ. संजय देसाई, प्रा. डॉ. सुजय पाटील, प्रा. डॉ. वैशाली सारंग, आदी प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील २४० हून अधिक प्राध्यापक उपस्थित होते. ‘सुटा’चे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. मनोज गुजर, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर काळे, ‘सुटा’ पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. चोपडे, प्राचार्य डॉ. राजेंद्र पोंदे, घाळी कॉलेजचे प्राचार्य प्रा. पाटील, आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. विजय देसाई यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com