SHIVAJI MAHARAJ DRAMA AUSTRALIA
SHIVAJI MAHARAJ DRAMA AUSTRALIAESAKAL

शिवरायांच्या जीवनावर आधारित मेलबोर्नमध्ये सादर झालेले महानाट्य “महाराज द किंग”

या कार्यक्रमाच्या प्रवेश शुल्कातून उपलब्ध झालेला निधी ऑस्ट्रेलियातील मोनाश चिल्ड्रेन्स हॉस्पिटलच्या फाउंडेशनला देणगी स्वरूपात देण्यात आला

मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) मधील 'जनगर्जना " या ग्रुपमार्फत नुकतेच शिवाजी महाराजांच्या जीवनांवर आधारित महाराज The King' हे नाटक 'बंजील प्लेस' येथे सादर करण्यात आले.

दीडशेहून अधिक स्थानिक कलाकारांनी प्रदर्शित केलेल्या या नाटकाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाटकाचा ऐतिहासिक विषय, उत्कृष्ट रंगमंच व्यवस्था, फिरता रंगमंच तसेच अप्रतिम प्रकाश-व्यवस्था यामुळे हा नाट्यप्रयोग रसिकांच्या कौतुकास पात्र ठरला.

या. नाटकात बाल - शिवाजीची भूमिका करण्याची संधी चि. अयान भक्ती मनिष मांगले या बालकलाकारास मिळाली. शिवरायांची भूमिका साकारण्यासाठी नाटकामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील तीन कलाकारांना ही संधी देण्यात आली. त्यामध्ये सर्वात लहान वयाचे शिवाजी बनून बाल शिवाजी' ची भूमिका साकारताना अयान'च्या अभिनयाला प्रचंड टोळ्यांच्या रूपात प्रेक्षकांनी दाद दिली.

बाल शिवाजीच्या रुपातील अयानचा रंगभूमीवरील वावर, आपल्या बाल-सवंगड्यांशी त्याने केलेले संभाषण, त्याच्या आवाजातील आश्वासकता, संवादफेक, अभिनय - कौशल्य यामुळे उपस्थितांनी त्याचे भरभरून कौतुक केले.

या कार्यक्रमास तब्बल ८५० हुन अधिक प्रेक्षकांनी आपली हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या प्रवेश शुल्कातून उपलब्ध झालेला निधी ऑस्ट्रेलियातील मोनाश चिल्ड्रेन्स हॉस्पिटलच्या फाउंडेशनला देणगी स्वरूपात देण्यात आला. या नाटकाचे निर्माते सतीश गायकवाड, दिग्दर्शक शिल्पा गायकवाड, लेखक प्रणव जतकर, व संगीतकार अभिजित जोशी यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या या नाटकाची लोकप्रियता लक्षाते घेऊन लवकरच या नाटकाचा दुसरा प्रयोग होणार आहे.

परदेशात राहूनही छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे हिंदवी स्वराज्य व महाराष्ट्र धर्म यांच्याविषयीची आत्मियता बाळगणाऱ्या मेलबोर्नमधील तमाम मराठी रसिक बांधवांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com