द्वीतीय वर्षाची परीक्षा घेताना महाविद्यालयांची कसरत

द्वीतीय वर्षाची परीक्षा घेताना महाविद्यालयांची कसरत

द्वितीय वर्षाची परीक्षा घेताना
महाविद्यालयांची होणार कसरत

आर्थिक खर्च पेलवेनाः पूर्वीप्रमाणे आता विद्यापीठाने जबाबदारी घ्यावी

संतोष मिठारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शिवाजी विद्यापीठाने मध्यवर्ती मूल्यमापन पद्धती लागू केल्याने द्वितीय वर्षाची (सेकंड ईअर) परीक्षा घेताना कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांना कसरत करावी लागत आहे. परीक्षा शुल्कातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा जादा खर्च होत असून ते अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे विद्यापीठाने द्वितीय वर्षाची परीक्षा घेण्याची जबाबदारी सांभाळावी, अशी आग्रही मागणी या महाविद्यालयांनी केली आहे.
वेळेत निकाल लावण्यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी गेल्या अकरा वर्षांपासून विद्यापीठाच्या सूचनेनुसार संलग्नित महाविद्यालयांकडून घेतल्या जात आहे. महाविद्यालयांनी या परीक्षांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यामुळे विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी द्वितीय वर्षाची परीक्षाही महाविद्यालयांकडे सोपविल्या आहेत. त्यासह मूल्यमापनासाठी मध्यवर्ती पद्धतीने लागू केली आहे. या पद्धतीनुसार परीक्षा घेतल्या. पण, त्यासाठी होणारा खर्च अधिकतर महाविद्यालयांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे या महाविद्यालयांनी द्वितीय वर्षाच्या परीक्षा विद्यापीठाने घेण्याची मागणी केली आहे. त्याबाबत महाविद्यालयांची मते जाणून घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाने परीक्षा सुधार समिती नेमली आहे. काही महाविद्यालयांनी त्यांचा खर्चाची माहिती विद्यापीठाला सादर केली आहे.
...
या कारणामुळे वाढला खर्च
विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातून जी रक्कम जमा होते, त्यापैकी ७५ टक्के रक्कम संबंधित महाविद्यालय आणि २५ टक्के रक्कम विद्यापीठाकडे जमा होते. या ७५ टक्के रकमेतून महाविद्यालय परीक्षांचा खर्च करते. मध्यवर्ती मूल्यमापन पद्धतीमुळे प्रत्येक महाविद्यालयाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचे प्रत्येकी तीन संच, मॉडेल उत्तरपत्रिका, मॉडेटेरेशन, कोडिंग आदी स्वरुपातील प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवावी लागत आहे. त्यासाठी आर्थिक खर्च करावा लागत आहे. विद्यार्थी संख्या जादा असणाऱ्या अनेक महाविद्यालयांना ते अधिक खर्चिक ठरत आहे. परीक्षा शुल्कातून मिळणाऱ्या रक्कमेपेक्षा खर्च अधिक होत आहे. विद्यापीठाने द्वितीय वर्षाची परीक्षा घेतल्यास खर्च कमी होणार आहे.
...

‘मध्यवर्ती मूल्यमापन पद्धतीने महाविद्यालयांचा परीक्षा घेण्याचा खर्च वाढला आहे. बहुतांश महाविद्यालयांना तो खर्च पेलवत नाही. त्यामुळे विद्यापीठाने एक तर परीक्षा शुल्कातून महाविद्यालयांना दिली जाणारी रक्कम दहा टक्क्यांनी वाढवावी. ते शक्य नसल्यास पूर्वीप्रमाणे द्वितीय वर्षाची परीक्षा विद्यापीठाने घ्यावी. त्याबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी प्राचार्य असोसिएशनने विद्यापीठाकडे केली आहे.
-डॉ. व्ही. एम. पाटील, सचिव, प्राचार्य असोसिएशन
...
२०१ महाविद्यालयांत
९६ हजार विद्यार्थी
विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांची एकूण संख्या २७६ इतकी आहे. त्यापैकी २०१ महाविद्यालयांमध्ये बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ९६ हजार इतकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com