विविध मागण्यांसाठी इंडिया आघाडीचे आंदोलन

विविध मागण्यांसाठी इंडिया आघाडीचे आंदोलन

ich31.jpg
87504
इचलकरंजी : इंडिया आघाडीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
-----------
विविध मागण्यांसाठी इंडिया आघाडीचे आंदोलन
मनुस्मृतीविरोधात प्रांत कार्यालय, प्रीपेड मीटर विरोधात महावितरणला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३ : इंडिया आघाडी इचलकरंजी तर्फे मनुस्मृतीविरोधात प्रांत कार्यालय व प्रीपेड मीटर विरोधात महावितरण कार्यालयात निवेदन दिले. प्रांत कार्यालयामध्ये शिरस्तेदार संजय काटकर, तर महावितरण कार्यालयामध्ये कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी निवेदन स्वीकारले.
काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी राज्य शासनाने मनुस्मृती व तत्सम धार्मिक बाबींचा शालेय अभ्यासक्रमात अंतर्भाव केल्यास त्या विरोधात सर्व मतदारसंघांत मनुस्मृतीचे दहन केले जाईल. मनुस्मृतीविरोधात प्रखर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा दिला.
महावितरण कार्यालय येथे बोलताना समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी चार हजार रुपये किमतीचे मीटर बारा हजार रुपयाला खरेदी केले आहेत. यामागील भ्रष्टाचाराची चौकशी करावी. ३०० युनिटच्या आत वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य वीज ग्राहकांचे सध्याचे पोस्टपेड मीटर ठेवावे. १२ हजार रुपयांच्या मीटरचा कोणताही भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांवर लादला जाता कामा नये, असे सांगितले.
प्रीपेड मीटर्सच्या विरोधातील कृती कार्यक्रम इंडिया आघाडीतर्फे जाहीर केला आहे. त्यानुसार प्रथम राज्यात जाहीर इशारा म्हणून निवेदने दिली जातील. दुसऱ्या टप्प्यात महावितरण कार्यालयासमोर मोर्चे व आंदोलने करण्यात येतील. तिसरा टप्पा म्हणून आजपासूनच राज्यात सर्वत्र वैयक्तिक वीज ग्राहकांचे लेखी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात मदन कारंडे, सागर चाळके, सयाजी चव्हाण, भरमा कांबळे, संजय कांबळे, राहुल खंजिरे, नंदा साळुंखे, ज्योत्स्ना भिसे उपस्थित होते.
--------------
मीटर कोणते असावे, याचा अधिकार ग्राहकास
मीटर कोणते असावे, याचे कायदेशीर अधिकार संबंधित वीज ग्राहकाला आहेत. त्यामुळे कोणत्याही वीजग्राहकावर प्रीपेड मीटरची सक्ती करता येणार नाही. अशी सक्ती कोठेही झाल्यास त्या सक्तीविरोधात त्वरित प्रखर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इंडिया आघाडीच्यावतीने देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com