धोकादायक दुभाजक

धोकादायक दुभाजक

फोटो- 87652

दुभाजकामधील ‘वाट’, अपघाताचा ‘स्पॉट’
शहरातील स्थिती : दुचाकीस्वार आडवे आल्याने सुटते वाहनावरील नियंत्रण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : चौक वा रस्त्यासाठी फाटा नसताना दुभाजकामधून दुचाकीसाठी दिलेली ‘वाट’ शहरात धोकादायक बनत आहे. त्यातून दुचाकीस्वार आडवे येत असल्याने अनेक ठिकाणी वाहनधारकांना वाहनावर नियंत्रण राखणे कठीण होत आहे. तसेच पादचाऱ्यांसाठी सोडलेल्या जागेतूनही अचानक रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांमुळे हे ‘स्पॉट’ अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.

शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचे काम २००९ मध्ये एकात्मिक रस्ते प्रकल्पांतर्गत करण्यात आले. त्यासाठी बहुतांश रस्त्यांवर दुभाजक करण्यात आले. काही रस्त्यांची रुंदी कमी असतानाही दुभाजक केले. चकाचक रस्ते, रंगवलेले दुभाजक नागरिकांना चांगले वाटत होते. काम सुरू असताना काही रस्ते भरवस्तीतील असल्याने तेथील दुभाजक अडचणींचे वाटत होते. दुभाजकांमुळे वाहनधारकांना चौकापर्यंत फिरून दुसऱ्या बाजूला जावे लागत होते. त्यामुळे काहींच्या हस्तक्षेपामुळे त्या दुभाजकांमधून ‘वाट’ करून देण्यात आली. त्यातून दुचाकीस्वारांची सोय केली. पण, वाहनांची संख्या वाढू लागली तशी ती ‘वाट’ धोकादायक बनत चालली आहे.
हॉकी स्टेडियम, राजेंद्रनगरजवळ, लक्ष्मीपुरी येथील रस्ते प्रकल्पात केलेल्या दुभाजकांना वाट करून दिली आहे. हॉकी स्टेडियम, राजेंद्रनगर हे रस्ते मोठे असल्याने वाहनांचा वेग असतो. अशा रस्त्यांवर दिलेल्या वाटेतून अचानक दुचाकीस्वार येतात. त्यावेळी चारचाकी तसेच अवजड वाहनधारकांना वाहनावर नियंत्रण राखणे कठीण होते. यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. पण, मोठ्या अपघाताचा धोका घोंगावत आहे. याबरोबरच अनेक ठिकाणी पादचाऱ्यांसाठीही जागा सोडल्या आहेत. त्यांचेही अचानक रस्त्यावर येणे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे.

चौकट
उलट दिशेने येणाऱ्यांमुळे धोका
अनेक ठिकाणी दुभाजक असल्याने दुचाकीस्वार सर्रास उलट दिशेने जात असतात. सरळ जाणारे वाहनधारक उलट येणाऱ्या वाहनधारकांमुळे गोंधळून जातात. त्यातूनही अपघाताचा धोका निर्माण होत आहे. पण, त्याबाबत शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही.

चौकट
रुक्मिणीनगरजवळील वळण धोकादायक
टेंबलाई नाका उड्डाणपूल पास केल्यानंतर रुक्मिणीनगरकडे जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागते. हे वळण घेत असताना पाठीमागून येणाऱ्या वाहनांकडून धोका आहे. तसेच वळत असताना समोरून येणाऱ्या वाहनांचाही धोका आहे. त्यामुळे या वळणाबाबत अजून गांभीर्याने घेतलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com