पावसाच्या अचूक अंदाजासाठी कोल्हापूरला हवे ‘डॉप्लर रडार’

पावसाच्या अचूक अंदाजासाठी कोल्हापूरला हवे ‘डॉप्लर रडार’

कोल्हापूरला हवे ‘डॉप्लर रडार’
पाऊस, ढगफुटी, वादळाचा अंदाज मिळणार चार तास आधी

प्रवीण देसाई ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः जिल्ह्याला दरवर्षी पुराचा फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळे पावसाचा अंदाज लावणे अवघड झाले आहे. या पार्श्र्वभूमीवर पावसाच्या अचूक अंदाजासाठी ‘डॉप्लर रडार’ केंद्रासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कोल्हापुरात गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करण्याची आवश्‍यकता आहे.
जिल्ह्यात २०१९ पासून दरवर्षी पावसाची सुरुवात व समाप्तीचा कालावधी यामध्ये झालेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांचे मशागत व पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. यामुळे पारंपरिक हवामान अंदाज चुकू लागले आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला दरवर्षी पुराचा फटका बसतो. डॉप्लर रडार हे तंत्रज्ञान हवामानाचे अचूक अंदाज देण्यासाठी उपयुक्त आहे, असे तज्ज्ञांसह अभ्यासकांचे मत आहे. हे रडार ढगफुटी, गारपीट, मुसळधार पाऊस, वादळ यांचा अंदाज चार तास आधी देऊ शकते. विशेषत: जिल्ह्याच्या डोंगराळ भागात ढगफुटी होण्याची शक्यता जास्त असल्याने, या तंत्रज्ञानाची गरज अधिक तीव्रतेने भासते. या रडारमुळे ढगांच्या हालचाली, वाऱ्याची दिशा आणि वेग, पावसाचे प्रमाण यांची अचूक माहिती मिळते. यामुळे वेळेत उपाययोजना करून जीवित आणि वित्त हानी टाळता येईल. तसेच, धरणातील पाण्याचे व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. या रडारची तातडीने उभारणी केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होऊ शकते.

राज्यात रडार केंद्रे
१)मुंबई
२) महाबळेश्वर
३) सोलापूर
४) नागपूर

डॉप्लर रडारचे प्रकार
१) एक्स बँड डॉप्लर रडार- हे कमी अंतरावरील हवामान स्थितीचा अंदाज लावण्यासाठी उपयुक्‍त
२) के. ए. बँड डॉप्लर रडार- हे अतिशय सूक्ष्म हवामान घटकांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त
.............................................................
कोट...
पावसासह ढग, वादळ याचा अचूक अंदाज येण्यासाठी डॉप्लर रडार केंद्र उपयुक्त आहे. कोल्हापुरात होणारा पाऊस व येणारा महापूर या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे रडार बसविणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पाठपुरावा करावा.
-डॉ. अमोल जरग, भूजलमाहिती अभ्यासक
.................................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com