आयुष्यात यश मिळवण्यासाठी पंचसुत्रीचा अवलंब करा

आयुष्यात यश मिळवण्यासाठी पंचसुत्रीचा अवलंब करा

87625
यशस्वीतेसाठी पंचसूत्री आत्मसात करा
यतीश शहा ः मेरी वेदर क्रिकेट क्लबतर्फे गुणवंताचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३ ः ‘‘जीवनात यशस्वी होण्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब केल्यास यश निश्‍चित मिळेल,’’ असे मत ‘सकाळ''चे सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा यांनी आज व्यक्त केले. शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघाच्या विद्या भवन येथे मेरी वेदर क्रिकेट क्लबतर्फे आयोजित केलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कारप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री. शहा म्हणाले, ‘‘दहावी-बारावीनंतर शैक्षणिक अभ्यासक्रम यशस्वी व्हायचे असेल तर गोडी निर्माण होईल, असा अभ्यासक्रम निवडा. सभोवताली काय सुरू आहे, त्याचा अभ्यास करा. निवडेलल्या क्षेत्राचे मूल्यमापन करा. निवडलेले क्षेत्र पुढील पाच ते सात वर्षे टिकणारे असावे. निवडलेल्या कोर्सचे व्यावसायिक मूल्य तपासा. स्वतःला आवडणारे काम निवडा. तुमची आवड पॅशन बनली पाहिजे. या पंचसूत्रीचा अवलंब करावा. समाज माध्यमांचा उपयोग जरूर करा. त्याचा उपयोग करून दहावी-बारावी आणि पदवी, पदव्युत्तरनंतरचे भवितव्य काय आहे. याची माहिती घ्या.’’
ते म्हणाले, ‘‘आयटी अभियंता बनून कोट्यवधीचे पॅकेज जरूर मिळवा. मात्र, सामाजिक भान, समाधान, आनंद देणारे काम निवडा. पालकांनीही मोबाईलचा वापर करू नका, अशी सक्ती न करता मार्गदर्शन करा. वेळेचे नियोजन करा. जगात काय सुरू आहे. याची माहिती घ्या. चांगल्या वाईट गोष्टी कळतील. वेळेचे नियोजन, पारदर्शकपणा, प्रामाणिकपणा, स्वतःची बलस्थाने आणि कमतरता यांची जाणीव करून घ्या.’’ जे कराल त्यात शंभर टक्के योगदान द्या. तरच जीवनात यशस्वी व्हाल.’’ मेरी वेदर क्लबतर्फे स्पोर्टस्‌ ॲकॅडमी स्थापन करावी. वेगळ्या खेळाचा उपक्रम राबविल्यास त्यास ‘सकाळ''चे कायम पाठबळ राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. स्वागत व प्रास्ताविक संजय साळोखे यांनी केले. पाहुण्याचा परिचय प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी करून दिला. यावेळी व्यासपीठावर क्लबचे समिती सदस्य बाजीराव कुंभार, माणिक ठाकूर, संग्राम सरनोबत, संजय साळोखे, अभिनंदन वणकुद्रे, अजित चौगुले उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com