हिरण्यकेशी प्रदूषणप्रश्नी संघटीत लढ्याचा निर्धार

हिरण्यकेशी प्रदूषणप्रश्नी संघटीत लढ्याचा निर्धार

हिरण्यकेशी प्रदूषणप्रश्नी
संघटित लढ्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ ः हिरण्यकेशी नदीत मिसळणाऱ्या मळीमिश्रित व सांडपाण्यामुळे नदीतील पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा फटका प्रामुख्याने नांगनूरसह कडलगे, अरळगुंडी गावकऱ्यांना बसत असून या विरोधात आता संघटित लढा देण्याचा निर्धार बैठकीत केला.
पाणी गढूळ व प्रदूषित झाले असून त्याचा नांगनूर, कडलगे, अरळगुंडीतील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक वर्षांपासून ही गंभीर समस्या सतावत आहे. जानेवारीत वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने संकलित केले. त्याचा अहवाल आल्यानंतर नागरिकांसह जनावरांना पिण्यासाठी नव्हे, तर दैनंदिन वापरासाठीही हे पाणी अतिशय हानिकारक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रश्नावर कायमस्वरूपी शाश्‍वत तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या प्रशासनाकडे पूर्व भागातील पीडित गावच्या नागरिकांना घेऊन संघटितपणे लढा देण्यासाठी एक लोकचळवळ उभी करणे गरजेचे असल्याचे अमर चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले. त्यासाठी गावागावांत जनजागृती करण्यासाठी बैठकांचे सत्र आयोजित करण्याचे ठरले.
शिवसेनेचे वसंत नाईक, कृषी पंपधारक समितीचे मार्गदर्शक अमृत शिंत्रे, किसान संघाचे बाळगोंड पाटील व या प्रश्नासाठी न्यायालयीन लढा देणारे शाहू मोकाशी यांनी नांगनूरमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. लवकरच या प्रश्नाबाबत दोन्ही राज्याच्या अधिकारी व लोकप्रतिनिधींना भेटून हिरण्यकेशी नदीपात्रात येणारे हानिकारक दूषित पाणी थांबवण्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी करण्याचेही ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com