भरधाव मोटारीने तिघांना उडविले, सहा जखमी

भरधाव मोटारीने तिघांना उडविले, सहा जखमी

फोटो ८७५९६,
८७५९१,८७५८९,८७५७७,८७५७२,८७५६८,८७६०३
००००००००००००


87573 - व्ही. एम. चव्हाण
87665 - अनिकेत चौगुले
87591 - प्रथमेश पाटील
87568 - हर्षद पाटील
आणि
87572
कोल्हापूर ः सायबर चौकात सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

भरधाव मोटारीच्या
धडकेत चौघे ठार
-------
सायबर चौकातील
अपघातात पाच जखमी
-------
सख्ख्या भावांसह मोटारचालक
माजी प्र-कुलगुरूंचा मृतात समावेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरूंच्या भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने सायबर चौकातील चार दुचाकींना उडविले. यात सख्ख्या भावांसह चौघे ठार झाले. त्यात ही मोटार चालविणारे माजी प्रकुलगुरू व्ही. एम. ऊर्फ वसंत मारुती चव्हाण (वय ७२, रा. प्लॉट नं. ७४, वैभव हौसिंग सोसायटी, शाहू टोल नाक्याजवळ, कोल्हापूर), हर्षद सचिन पाटील (१६) आणि त्याचा भाऊ प्रथमेश सचिन पाटील (१९, दोघे रा. दौलतनगर), अनिकेत आनंदा चौगुले (२५, रा. पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा) यांचा मृत्यू झाला. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
अपघातात जयराज संतोष पाटील (१९, मूळ असळज, ता. गगनबावडा, सध्या रा. दौलतनगर) मयूर मारुती खोत (२४ चांदेकरवाडी, ता. राधानगरी) धनाजी शंकर कोळी (४४), शुभांगी धनाजी कोळी (३८) आणि समर्थ पंकज पाटील (एक वर्ष, सर्व. रा. कणेरीवाडी, ता. करवीर) अशी जखमींची नावे असल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले. पैकी कोळी दांपत्यासह समर्थ किरकोळ जखमी आहे. स्थानिक रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मयूर खोत याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यानेही खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यांचा जबाब घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शवविच्छेदन करून रात्री उशिरापर्यंत मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे सीपीआरमध्ये नातेवाईकांची गर्दी होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः राजाराम कॉलेजकडून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने बंद असलेल्या सायबर सिग्नल चौकात चार दुचाकींना उडविले. यामध्ये चौघे ठार झाले तर उर्वरित सहाजण जखमी झाले. जखमीत एक वर्षाचा एक मुलगा आहे. आज दुपारी दोन वाजून २५ मिनिटांनी अपघात झाला. परिसरातील सीसीटीव्हीत अपघात कैद झाला आहे. धडक इतकी वेगाने होती की त्या परिसरातील सिग्नलचा खांब, पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा खांब जमीनदोस्त झाला. आज चौकात गर्दी होती. सिग्नल परिसरातून थेट रस्त्याच्या बाजूला मोटार गेल्यामुळे अन्य प्रवासी थोडक्यात बचावले.
प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्यानुसार, राजाराम कॉलेज समोरील उतारावरून मोटार वेगाने सायबर चौकात आली होती. काही क्षणात मोटारीने बंद असलेल्या सायबर सिग्नलवरून जाणाऱ्या चार दुचाकींना उडवले. तेथून मोटार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिग्नल आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टीमच्या खांबावर जाऊन आदळली. यामुळे मोठा फटाका फोडल्यासारखा आवाज झाला. परिसरातील वडापाव गाड्यावरील नितीन मोरे व रिक्षाचालक जितेंद्र शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक, व्यापारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उलटलेली मोटार सरळ केली. यावेळी मोटारीतील चालकाला तेथून बाहेर काढताना त्याच्या डोळ्यावर पूर्वीच ड्रेसिंग पट्टी होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते, असे दिसले. अपघात झाल्यानंतर ते जिवंत होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. स्थानिकांनी मोटारीचा दरवाजा उघडल्यानंतर ते सीटवरून बाजूला कोसळले.
दरम्यान, मोटारीने धडक दिल्यानंतर तेथील दुचाकीवरून फरफटत गेलेल्यांची शोधाशोध सुरू झाली. त्यापैकी एकजण शेजारीच असलेल्या एका खुल्या टेम्पोत जाऊन पडला होता. उर्वरित रस्त्यापासून सुमारे ८०-१०० फुटांवर पडलेले होते. त्यांना एकत्रित करून तातडीने राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांना सीपीआरमध्ये दाखल केले. येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली. पोलिसांना यायला पंधरा मिनिटांहून अधिक कालावधी लागला तर रुग्णवाहिकाही वेळेवर पोहोचली नाही. त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढली. नेमका कोण जखमी आहे, त्यांची ओळख पटविण्यासाठीही धावाधाव करावी लागली, असेही स्थानिकांनी संगितले.

घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक जयश्री देसाई, शहर उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करताना अपघातस्थळाभोवती बॅरिकेड लावले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी चौकातील गर्दी हटवत वाहतूक सुरळीत केली.

अपघातानंतर दुचाकीस्वार हवेत उडाले
भरधाव मोटारीने चौकातील चार दुचाकीस्वारांना उडविले. त्यापैकी साधारण दहा-पंधरा फूट उंच हवेत फेकले गेले. अन्य दुचाकीसह फरफटत गेले. चौकात बाजूला असलेल्या सिग्नलच्या खांबावर ठोकरल्यामुळेच मोटार थांबली. यावेळी याच परिसरात मोठे बांधकाम सुरू आहे. खांब नसते तर ही मोटार थेट बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात गेली असती. मोटारीने ज्या तीन दुचाकींना ठोकर दिली आहे त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचा थरार पाहणाऱ्यांनी तातडीने मदत केल्यामुळे काही जखमींवर तातडीने उपचार होऊ शकले.

हर्षद उडून थेट हौदा टेम्पोत...
मोटारीने धडक दिल्यानंतर चौक परिसरात थांबलेल्या पिकअप टेम्पोमध्ये हर्षद उडून पडला. त्यावेळी टेम्पोतील चालक बाहेर आला. त्याला नेमके काय झाले, हेच कळाले नाही. यावेळी तेथील आणखी एक जखमी जयराज संतोष पाटील याला सुद्धा त्याच पिकअप टेम्पोतून ठेवून कॉन्स्टेबल गौतम कांबळे व स्थानिक व्यापारी नितीन मोरे यांनी सीपीआरमध्ये आणले. यामुळे जखमी जयराजवर वेळीच उपचार सुरू झाले.

व्हिडिओ व्हायरल...
सायबर चौकात झालेल्‍या अपघाताचा सीसीटीव्हीतील व्हिडिओ दीड-दोन तासांत व्हायरल झाला. सीपीआर परिसरात झालेल्या गर्दीच्या ठिकाणीही अनेकजण मोबाईल स्क्रिनवर व्हिडिओ पाहून हळहळत होते. व्हिडिओ पाहून शहरातील अनेकांनी सीपीआरकडे धाव घेतली होती. अपघाताची तीव्रता व्हायरल व्हिडिओमुळे काही मिनिटांत राज्यभर पसरली.
------------
वडिलांना सोडले आणि...
मयूर खोत याने आज दुपारी वडिलांना टाकाळा येथील रुग्णालयात सोडले आणि तो घरी निघाला. सायबर चौकात भरधाव वेगाने मोटारीची त्याच्याही दुचाकीला धडक बसली. यात तो फरफटत गेला. त्याच्या पायाला दुखापत झाली; मात्र त्याला गंभीर दुखापत झाली नाही. त्याच्यावर हॉकी स्टेडियम येथील खासगी रुग्णालयात उपचार झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा जबाब घेण्याचे काम सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com