सहकार व वस्त्रोद्योग विषयक प्रतिक्रीया

सहकार व वस्त्रोद्योग विषयक प्रतिक्रीया

सहकार व वस्त्रोद्योग
........................
जी.डी.पाटील
87685
पीक कर्जाची मर्यादा वाढवावी
सहकार हा ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. तो आणखी भक्कम करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची गरज आहे. यासाठी सहकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या पीक कर्जाची मर्यादा तीन लाखांवरून वाढवून पाच लाखांपर्यंत करावी. तसेच आकस्मिक व खावटी कर्जाचे व्याजदर कमी करावेत. साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांची होणारी लूट थांबवावी, यासाठी खासदारांनी शासनपातळीवर पाठपुरावा करावा.
- जी. डी. पाटील, माजी अध्यक्ष, शेतकरी संघ
............................................................
अशोक स्वामी
87687
सूत आणि कापडावरील निर्यातबंदी उठवावी
नवीन वस्त्रोद्योग धोरण अतिशय चांगले असून, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. पूर्वी सूत आणि कापडाची निर्यात व्हायची, परंतु आता निर्यातबंदीमुळे बाहेरील देशांकडून माल घेण्याची परिस्थिती आली आहे. त्यामुळे आपल्याकडील मालाचा उठाव होत नाही. परिणामी त्यावर अवलंबून असलेल्या यंत्रमाग, सायझिंग, प्रोसेसिंग हाऊस, गारमेंट ही साखळीच दोन वर्षे बंद पडली आहे. यासाठी सूत व कापडाला निर्यातीसाठी परवानगी मिळावी. यासाठी खासदारांनी पाठपुरावा करावा.
- अशोक स्वामी, अध्यक्ष महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंडळ
..............................................................
मोहन सालपे
87686
सहकाराच्या विविध योजनांची अंमलबजावणी करावी
केंद्र सरकारने नवीन सहकार खाते निर्माण केले आहे. त्याला भरपूर अधिकार असल्याने शेतकऱ्यांसाठी सहकाराच्या माध्यमातून विविध योजना राबविणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रात सहकाराचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सहकाराच्या विविध योजना महाराष्ट्रासह कोल्हापूरात राबविण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा करावा.
- मोहन सालपे, माजी सचिव, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
..................................................................................
अरुण काकडे
87688

सेवा संस्था, शेतीमाल संस्था सक्षम कराव्यात
केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या किसान समृद्धी योजना, सी.एस.सी. सेंटर, जेनेरिक स्टोअर्स आदी विविध योजना अधिक व्यापकपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्याचबरोबर शेतीमाल सहकारी संस्था व विकास सेवा संस्थांना सक्षम करण्यासाठी त्यांना बाजारपेठ व आधारभूत किंमत निश्‍चित करण्याची गरज आहे. यामध्ये खासदारांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
- अरुण काकडे, माजी विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था)
........................................................
शशिकांत पाटील-चुयेकर
87689

सहकारातून शेतकऱ्यांना बळ द्यावे
सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ मिळण्याची आवश्‍यकता आहे. सध्या साखर कारखानदारी अडचणीत असून, यावर मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे कारखानदारीला आर्थिक बळ देऊन शेतकऱ्यांना उभे करण्याची गरज आहे. त्याचबरोबर गाय व म्हैस दूध दराला सरसकट अनुदान द्यावे. खते, बी-बियाणे यांना सबसिडी देऊन पाणीपट्टी दर कमी करावा, यासाठी खासदारांनी पाठपुरावा करावा.
- शशिकांत पाटील-चुयेकर, संचालक, गोकुळ दुध संघ
...........................................................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com