चंदगड मतदारसंघ वार्तापत्र

चंदगड मतदारसंघ वार्तापत्र

चंदगड
-सुनील कोंडुसकर

मंडलिकांवरील नाराजी मतपेटीतून व्यक्त
चंदगड : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व प्रा. संजय मंडलिक यांच्या लढाईत चंदगड मतदारसंघातून प्रा. मंडलिक मताधिक्य घेतील अशी, अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, तो कयास फसल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच तालुक्यात विरोधी वातावरण तयार झाले. यात ते ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करीत होते आणि ज्या मित्रपक्षांचा पाठिंबा होता त्यांचे कार्यकर्तेही खासगीत हाच सूर आळवत होते. ती नाराजी मतमेटीतून व्यक्त झाली.
--
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा मतदारांतही मोठा राग होता. विधानसभेचे पुढे बघू, आता शाहू महाराजच हे वातावरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहिले. महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांनी सुरुवातीपासून योग्य नियोजन राबवले. महाराजांच्या प्रचाराचा प्रारंभच चंदगड तालुक्यातून झाला. तीन दिवसांत त्यांनी ज्या-ज्या भागांत भेटी दिल्या तेथील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या सर्वच मध्यवर्ती प्रचारसभांना उत्स्फूर्त गर्दीचे चित्र होते. आमदार सतेज पाटील यांनी नेटके नियोजन राबवले. गोपाळराव पाटील, अप्पी पाटील, जयवंतराव शिंपी, मुकुंददादा देसाई, डॉ. नंदिनी बाभूळकर, स्वाती कोरी, अमर चव्हाण, नितीन पाटील, संभाजीराव देसाई, विद्याधर गुरबे, जे. बी. पाटील, विलास पाटील, कलाप्पा भोगण, प्रा. सुनील शिंत्रे या सर्वांनी एकजुटीने सर्व सभा एका छताखाली घेतल्या. विरोधी महायुतीतून मात्र प्रत्येक नेता आपली निष्ठा दाखवण्यासाठी धडपडत होता. अपवाद वगळता प्रत्येकाने आपल्या झेंड्याखाली प्रचार सभा घेतली. उमेदवाराच्या पक्षाचा झेंडा आणि त्याचे चिन्ह लावण्याचे भानही राहिले नाही. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मित्र पक्षातील प्रतिस्पर्धी उमेदवार तिथे दिसणार नाही याची खबरदारी घेतली. एका अर्थाने ती त्यांच्यातीलच लढाई असल्याचे चित्र दिसले. काहींनी व्यासपीठावर उपस्थिती लावली. मात्र प्रत्यक्षात प्रचारासाठी फार कष्ट घेतले नाहीत. आमदार राजेश पाटील व शिवाजीराव पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
प्रा. मंडलिक यांनी या विभागासाठी पाच वर्षात विकासनिधी मोठ्या प्रमाणात दिला मात्र त्यांचा संपर्क नाही ही लोकांत खंत होती. शाहू महाराजांची उमेदवारी मतदारांनी उचलून धरली. त्यामुळे काही भागात प्रचार नसतानाही महाराजांना चांगले मतदान झाले.

घडले काय?
* महाविकास आघाडीत एकजुटीचे दर्शन
* शाहू महाराजांची उमेदवारी मतदारांनी मनोमन स्वीकारली
* सुरुवातीपासून शेवटपर्यंत महाराजांचेच वातावरण
* शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावरील सहानुभूतीचा परिणाम
* भाजपच्या फोडाफाडीच्या राजकारणावर नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com