मडंप कोसळून तीन पोलिस कर्मचारी जखमी

मडंप कोसळून तीन पोलिस कर्मचारी जखमी

88014
...
मंडप कोसळून तीन पोलिस जखमी
हातकणंगले मतमोजणी केंद्राजवळील घटना ः बावीसजण थोडक्यात बचावले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः राजाराम तलावजवळील शासकीय गोदामाजवळ पोलिस कर्मचाऱ्यांकरिता तात्पुरता उभारण्यात आलेला मंडप कोसळला. या मंडपावर घालण्यात आलेले स्टीलचे पत्रे अंगावर पडल्याने तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. शुभांगी वाघमारे, शीतल लाड, महेश शिंदे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. अन्य कर्मचाऱ्यांनी या तिघांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
शासकीय गोदामजवळ बंदोबस्तावरील पोलिसांकरिता उन्हापासून संरक्षण व्हावे, काहीकाळ विश्रांती घेता यावी, याकरिता मंडप उभारण्यात आला होता. या मंडपात पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण २५ जण अल्पोपहार करून काहीकाळ विश्रांतीसाठी बसले होते. दुपारी एक वाजून ५५ मिनिटांनी अचानक वादळी वारे निर्माण झाले. यात हा मंडप कोसळला. मंडपावर स्टीलचे पत्रे होते. त्या पत्र्यांखाली महिला पोलिस कर्मचारी वाघमारे, लाड आणि शिंदे सापडले. तिघेही जखमी झाल्यामुळे बंदोबस्तावरील अन्य कर्माचाऱ्यांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. हा मंडप अत्यंत तकलादू पद्धतीने उभारण्यात आला होता. त्याचे खांब जमिनीमध्ये न रोवता तसेच उभे करण्यात आले होते. त्यामुळे वारे आल्यानंतर हा मंडप कोसळला आणि त्यात हे तिघे जखमी झाले. तर अन्य बावीसजणांनी तत्काळ बाहेर धाव घेतल्यामुळे ते थोडक्यात बचावले. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com