कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ वार्तापत्र

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ वार्तापत्र

कोल्हापूर दक्षिण
-ओंकार धर्माधिकारी

काँग्रेसला आघाडी, भाजपला संधी
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना सहा हजारांचे मताधिक्य मिळाले. काँग्रेसकडेच असणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसने आघाडी टिकवली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षानेही या विधानसभा मतदारसंघातून चांगली मते घेतली. शिवाय काँग्रेसचे मताधिक्यकही रोखले. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत इथे काटाजोड लढत होण्याची शक्यता अधिक आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ मध्ये भाजपच्या अमल महाडिक यांनी विजय मिळवला आणि या मतदारसंघावर आपला दावा कायम केला. मात्र, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी तब्बल ४० हजार मताधिक्याने विजय मिळवून पुन्हा हा मतदारसंघ भाजपकडून खेचून आणला. या विधानसभा मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील आणि तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी विकासकामे, लोकसंपर्क आणि संघटन बांधणी यातून मतदारसंघावर आपली पकड पक्की केली. २०१९ ते २०२४ या कालावधीत भाजपचे या मतदारसंघात फारसे अस्तित्व उरले नाही. ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेसची सरशी झाली. त्यामुळे भाजप कार्यकर्तेही अस्वस्थ होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर या मतदारसंघात पुन्हा एकदा अमल महाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले. त्यांनी शहरी भागात आणि गावोगावी असणाऱ्या कार्यकर्त्यांची मोट बांधली. मेळावे आणि घरोघरी संपर्क केला. काँग्रेसकडे असणाऱ्या या मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना मोठे मताधिक्य मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना ६ हजार मताधिक्यच मिळवता आले. या तुलनेत करवीर, राधानगरी, चंदगड आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात अधिक मताधिक्य मिळाले. ही बाब काँग्रेस नेतृत्वाला विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघात जरी काँग्रेसला मताधिक्य मिळाले असले तरी भाजपलाही विधानसभेची संधी मिळाली असल्याचे लोकसभा निकालावरून दिसून येते. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक जरी लोकसभेची असली तरी तयारी मात्र विधानसभेची सुरू होती. अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांनी विधानसभेसाठी मतदारसंघाची पेरणी केली आहे. संघटनात्मक बांधणी आणि मतदारांशी संपर्क त्यांनी यानिमित्ताने केला आहे.

परिणामकारक घटक
-काँग्रेसने मताधिक्य राखले.
-शिवसेनेनेही घेतली चांगली मते
-भाजपसाठी विधानसभेला अनुकूल स्थिती.
-काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मताधिक्य राखण्याचे आव्हान.
-विधानसभेसाठी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचा दावा प्रबळ

-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com