उत्तर विधानसभा विश्‍लेषण

उत्तर विधानसभा विश्‍लेषण

उत्तर विधानसभा
-लुमाकांत नलवडे
--------------

मुख्यमंत्र्यांचेही प्रयत्न ठरले अपुरे
कोल्हापूर : ज्या मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ‘रोड शो’ करून वातावरण निर्मिती केली. त्याचा फारसा परिणाम मतदारांवर झाला नाही. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे उमेदवार असल्यामुळे त्यांना मताधिक्य मिळाले हे खरे असले तरीही मतांची जुळवाजुवळ करण्यात शिवसेना अपयशी ठरल्याचे दिसून आले. त्यामुळेच गतवेळी पंचवीस हजारांहून अधिक मिळालेले मताधिक्य यावेळी १४ हजारांपर्यंत खाली आले. मतदारांचा कौल पुन्हा एकदा शिवसेनेकडून कॉंग्रेसकडे जात असल्याचे दिसले.

या मतदारसंघात कॉंग्रेसचे मालोजीराजे छत्रपती यांचा पराभव करून शिवसेनेने कॉंग्रेसकडून हा मतदारसंघ पुन्हा हिसकावून घेतला. त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी सेनेला ऊर्जितावस्था दिली. त्यातून त्यांना दुसऱ्यांना विजयी करून उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. मात्र, आमदार सतेज पाटील यांच्या ताकदीने कॉंग्रेसचे चंद्रकांत जाधव यांनी ‘उत्तर’ पुन्हा कॉंग्रेसमय केले. पुढे त्यांच्या निधनानंतर पत्नी जयश्री जाधव यांना कॉंग्रेसमधून ‘उत्तर’च्या मतदारांनी विजयी केले. या वेळी क्षीरसागर यांचेही सहकार्य लाभले. मात्र, राज्यातील सत्तेच्या ध्रुवीकरणानंतर पुन्हा एकदा शिवसेने ‘उत्तर’कडे लक्ष केंद्रीत केले. पुढील विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे शिवसेनेचे पायघट्ट रोवण्याचा प्रयत्न लोकसभा आणि शिवसेना अधिवेशनाच्या निमित्ताने केला. मात्र, मतदारांनी त्याला धुडकावल्याचे दिसते. त्यामुळेच गतवेळपेक्षा यावेळी मंडलिकांना कमी मते मिळाली.
कसबाबावडा हा ‘उत्तर’मधील कळीचा मुद्दा आहे. तेथे कॉंग्रेसला सहा हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले. तसेच संपूर्ण ‘उत्तर’ मध्ये १४ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले. लाईनबाजार, भोसलेवाडी, जाधववाडी, कदमवाडी, सदरबाजार सिद्धार्थ नगर, बुधवार पेठ, नागाळा पार्क येथे मताधिक्य मिळाले. ही कॉंग्रेससाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. याउलट मंडलिकांना शिवाजी पार्क, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, टाकाळा, शाहूपुरी, साईक्स एक्सेंज, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, शाहू उद्यान, दुधाळी उत्तरेश्‍वर पेठ येथे मताधिक्य मिळाले. त्यामुळे अजूनही प्रयत्न केले तर ‘उत्तर’ शिवसेनेला मिळू शकते. पण, ते कॅश करण्यासाठी कॉंग्रेस इतके प्रयत्न होताना दिसत नाहीत. आकडेवारीच्या मताधिक्यात केवळ शिवसेना नसून भाजपसह इतरांचेही मते असल्याचेही विसरून चालणार नाही.

चौकट
परिणामकारक घटक
-मतांच्या जोडण्यात शिवसेना अपयशी
-काही ठिकाणी महायुतीला मिळाले मताधिक्य
-मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न, तरीही मतदारांनी धुडकावले
-श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचा आजही मान
-शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसला पसंती
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com