टपालीमध्येही श्रीमंत शाहू छत्रपती महाराज पुढे

टपालीमध्येही श्रीमंत शाहू छत्रपती महाराज पुढे

‘टपाली’मतातही शाहू महाराजांची आघाडी
- संजय मंडलिकांना २५४४ मते ः ७०४३ मतदान वैध; ८४४ मतदान अवैध

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या कॉंग्रेस इंडिया आघाडीचे उमदेवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना ‘टपाली’ मतामध्येही १६५५ इतके मोठे मताधिक्य मिळाले. प्रतिस्पर्धी शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना २५४४ मते मिळाली. एकूण ७९३८ टपाली मतदानापैकी ७०४३ मतदान वैध, तर ८४४ मतदान अवैध झाले.
रमणमळा येथील शासकीय गोदाम येथे कोल्हापूर मतदारसंघातील मतमोजणीची सुरुवात सकाळी आठ वाजता टपाली मतदानाने झाली. पहिली फेरी आठ टेबलवर झाली. यामध्ये दुपारपर्यंत ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांची मते मोजण्यात आली. यानंतर १८ टेबलवर दुसरी फेरी होऊन यामध्ये सैनिकांची व निवडणूक कामातील अधिकारी व कर्मचारी यांची मते मोजण्यात आली. यामध्ये एकूण ७९३८ टपाली मतदानापैकी ७०४३ मतदान वैध, तर ८४४ मतदान अवैध झाले. या टपाली मतदानामध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना ४१९९ इतकी मते मिळाली, तर संजय मंडलिक यांना २५४४ मते मिळाली. त्याखालोखाल उमेदवार बी. टी. पाटील यांना ९६, संजय मागाडे यांना ५६, संदीप कोगले यांना २३, शशिभूषण देसाई यांना १५, बाजीराव खाडे यांना १५, राजेंद्र कोळी यांना १५, नागनाथ बेनके यांना १२, अरविंद माने यांना १२, डॉ. सुनील पाटील यांना ७, संतोष बिसुरे यांना ४, कुदरतुल्ला लतीफ यांना २, इरफान चॉंद यांना २, कृष्णा देसाई यांना २, कृष्णबल चौगले यांना १८, माधुरी जाधव यांना ५, मुस्ताक मुल्ला यांना २, मंगेश पाटील यांना ६, ॲड. यश हेगडे-पाटील यांना २, सलीम बागवान यांना १, सुभाष देसाई यांना दोन, संदीप संकपाळ यांना तीन मते मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com