‘राष्ट्रवादी’ अजित पवार गट ‘बॅकफूट’वर

‘राष्ट्रवादी’ अजित पवार गट ‘बॅकफूट’वर

लोगो
राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवार गट


बालेकिल्ल्यात अपेक्षित
मताधिक्य देण्यात कमी

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीने (अजित पवार गट) राज्याच्या राजकारणात महायुतीसोबत सत्तेत सहभागी होण्याची भूमिका कोल्हापूरच्या मतदारांना रुचली नसल्याचे लोकसभा निवडणुकीतील कौलाने दिसून आले. त्यांच्या गटाचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या कागल, चंदगड, राधानगरी विधानसभा मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य देण्यात ते कमी पडले आहेत. त्यामुळे हा गट ‘बॅकफूट’वर आला आहे.
-संतोष मिठारी

या निवडणुकीत सुरुवातीपासूनच या गटाच्या एकूणच कामगिरीवर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संशय व्यक्त होत राहिला. काही ठिकाणी उघडपणे ते दिसूनही आले. मंत्री मुश्रीफ आणि त्यांच्या गटाच्या इतर प्रमुख नेत्यांना गावपातळीवरील कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात यश आले नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटात पालकमंत्री मुश्रीफ यांचा एकखांबी तंबू असून, त्यांचे कार्यकर्ते प्रा. मंडलिक यांच्या प्रचारात सहभागी झाले. जिल्हा बँकेसह साखर कारखाने यांसह बहुतांश सत्तास्थाने या गटाकडे असूनही प्रा. मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळवून देण्यात ते कमी पडले. भुदरगड तालुक्यात अजित पवार गट भक्कम आहे. तेथे माजी आमदार के. पी. पाटील नेतृत्व करीत आहेत. कागल, गडहिंग्लज, आजरा तालुक्यांत पालकमंत्री मुश्रीफ यांचा, तर चंदगडमध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा चांगला प्रभाव आहे. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर पन्हाळ्याचा गड सांभाळत आहेत. ही ताकद कायम ठेवण्याचे आव्हान या गटाला पेलता आले नाही. राधानगरीमध्ये चांगला प्रभाव असलेले ए. वाय. पाटील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या व्यासपीठावर दिसले. हातकणंगले मतदारसंघात या गटाची फारशी ताकद नाही. त्यामुळे तेथे महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून नावपुरते या गटाचे अस्तित्व राहिले.

चौकट
अन्यथा, मंत्री मुश्रीफांना भाविष्यात त्रास
मंत्री मुश्रीफ यांच्या गटाकडून चांगली ताकद मिळणार या विश्वासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले मतदारसंघावर अधिक लक्ष दिले. पण, अपेक्षित ताकद मिळाली नसल्याने प्रा. मंडलिक यांचा पराभव झाला. हा पराभव मंडलिक गटाच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेपूर्वी मंडलिक गटाची समजूत काढण्यासह आपल्यावरील संशय दूर करण्याचे काम प्राधान्याने मंत्री मुश्रीफ यांना करावे लागणार आहे. अन्यथा, त्यांना भविष्यात त्रास होणार आहे.

चौकट
घडले काय?
* ए. वाय. पाटील काँग्रेसच्या व्यासपीठावर
*हातकणंगले मतदारसंघात नावपुरतेच अस्तित्व
*कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात नेत्यांना अपयश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com