अडीच कोटींचा रस्ता रखडला-

अडीच कोटींचा रस्ता रखडला-

फोटो 88171
-----
लोगोः महापालिका

अडीच कोटींचा ‘मॉडेल’ रस्ताच रखडला
वर्षभरापासून काम; भुयारी गटार व अर्धवट फूटपाथ इतकीच प्रगती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः शहरातील इतर रस्ते कशा पद्धतीने केले जावेत याचे ‘मॉडेल’ म्हणून केला जात असलेला तब्बल अडीच कोटींचा मॉडेल रस्ताच रखडला आहे. एका बाजूची झालेली भुयारी गटार व अर्धवट फूटपाथ इतकीच प्रगती वर्षभरात असून, हेच ‘मॉडेल’ का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
रस्ते केले जात असताना त्यासोबत काय सुविधा असायला हव्यात याचे एक मॉडेल बनवले जावे या दृष्टिकोनातून महापालिकेला शासनाकडून निधी आला होता. तब्बल अडीच कोटींच्या निधीतून हा मॉडेल रस्ता करण्याचे नियोजन करण्यात आले. त्याकरिता कळंबा साईमंदिर ते साळोखेनगर पाण्याची टाकी या रस्त्याची निवड केली. कळंबा-आपटेनगर रिंगरोडवरील हा भाग असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर अवजड तसेच उपनगरातील नागरिकांची मोठी वाहतूक असते. गेल्यावर्षी वर्कऑर्डर दिली होती. या रस्त्यावर पूर्वी झालेले डांबरीकरण नीट झाले नसल्याच्या तक्रारी होत्या. तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरूनच पाणी वाहून जात होते. त्यामुळे या मॉडेल रस्त्याने काही अंतराचा रस्ता तरी नीट होईल अशी अपेक्षा होती.
हे काम सुरू झाल्यानंतर त्यासाठी एका बाजूच्या भुयारी गटारीसाठी पाईप टाकल्या. त्यानंतर त्यावर केल्या जाणाऱ्या फूटपाथचा भाग रस्त्यात येत होता. तिथे असलेल्या दुकानांत येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावर येत होती. त्‍यामुळे नागरिकांच्या तक्रारी झाल्या. या प्रकाराने रस्त्याचे काम रखडत गेले. गेल्या महिन्यापर्यंत रखडलेल्या कामाला गती मिळालेली नव्हती. यामुळे मॉडेल रस्ता कसा असावा, अशी संकल्पना असताना रस्ता रखडण्याचे मॉडेल कसे असावे हेच या कामातून दिसत आहे.

कोट
विलंब झालेल्या या रस्त्याच्या कामाला आता गती दिली आहे. लवकर काम पूर्ण करून घेतले जात आहे.
-महादेव फुलारी, उपशहर अभियंता

कोट
अडीच कोटीतून रस्त्याचे होणारे काम
* ३० मीटर रुंदी
* ४०० मीटर लांबी
* दोन्ही बाजूला फूटपाथ
* भुयारी गटार व्यवस्था
* सायकल ट्रॅक
* दुभाजक
* डांबरीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com