प्रवेश क्षमतेपेक्षा ११९ अर्ज अधिक

प्रवेश क्षमतेपेक्षा ११९ अर्ज अधिक

प्रवेश क्षमतेपेक्षा ११९ अर्ज अधिक
अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश प्रक्रिया : गडहिंग्लजला १६१९ अर्ज दाखल
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज स्वीकृतीच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत १६१९ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. विज्ञान शाखेसाठी प्रवेश क्षमता १५०० इतकी आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा ११९ अर्ज अधिक आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत २२ अर्ज कमी आले आहेत.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत यंदा आठ कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यांच्या सहा अनुदानित तुकड्यांत ५२०, तर १३ विनाअनुदानित तुकड्यात ९८० इतकी प्रवेश क्षमता आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला २८ मेपासून प्रारंभ झाला. अर्ज विक्री व स्वीकृतीची मुदत सुरवातीला १ जूनपर्यंत होती. त्यानंतर आजपर्यंत मुदत वाढविली होती. या मुदतीत १६९६ अर्जांची विक्री झाली. १६१९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा ११९ अर्ज अधिक आले आहेत. गतवर्षी १६४१ अर्ज आले होते. या तुलनेत यंदा २२ अर्ज कमी आले आहेत. संवर्गनिहाय दाखल झालेले अर्ज असे : एससी-९४, एसटी-३, व्हीजे-४१, एनटी बी-४२, एनटी सी-१९, एनटी डी-१, एसबीसी-७, ओबीसी-१३५, एसईबीसी-२७५, ईडब्ल्यूएस-३९, दिव्यांग-१, माजी सैनिक-३३, प्रकल्पग्रस्त-८, खुला-९२१.
दरम्यान, गतवर्षीही प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आले होते. त्यामुळे गरज भासल्यास प्रत्येक तुकडीत पाच जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. पण, पॉलिटेक्निकसह अन्य ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने विज्ञानच्या काही जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदाही क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आले असले तरी गतवर्षीसारखीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रवेशाच्या यंदा दोन फेऱ्या होणार असल्याने पसंतीच्या महाविद्यालयांत प्रवेशाची अधिक संधी मिळणार आहे.
-----------------
पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी
अकरावी विज्ञान शाखेसाठी अर्ज स्वीकृतीची आज मुदत संपली. आता अर्ज ऑनलाईन करणे आणि छाननीसाठी पाच दिवसांचा कालावधी जाणार आहे. पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी (ता. ११) प्रसिद्ध केली जाईल. दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १६ जूनला प्रसिद्ध केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com