इचलकरंजीत गटारीचे पाणी घरात

इचलकरंजीत गटारीचे पाणी घरात

ich51.jpg
88201
इचलकरंजी : सारण गटार तुंबून कचरा मार्गावर पसरला होता.
-------------
इचलकरंजीत गटारीचे पाणी घरात
डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, दत्तनगरमधील नागरिकांची तारांबळ
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ५ : शहरात मंगळवारी झालेल्या पावसामुळे डेक्कन स्पिनिंग मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर व दत्तनगर येथे पावसामुळे गटरीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. या पाण्यासोबत गटारीत साचलेला कचराही आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती, तर काही ठिकाणी नागरिक रात्री उशिरापर्यंत घरातील पाणी काढताना दिसून येत होते. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या कागदावरील स्वच्छता मोहिमेबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
शहरात डेंगी व चिकनगुनिया, ताप, सर्दी, अंगदुखी, खोकला अशा साथीचे रुग्ण आढळून येत असतात. अनेक ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या गटारी दिसून येतात. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने पावसाचे पाणी वाहते राहण्यासाठी गटारींची स्वच्छता करते. मात्र यंदा अनेक गटारी स्वच्छतेपासून वंचित राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
शहरात मंगळवारी दुपारनंतर पावसाने सुरुवात केली. पाऊस मध्यम स्वरूपाचा झाला असला तरी शहरातील अनेक ठिकाणच्या गटारी तुंबून गेलेल्या दिसून आल्या. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, दत्तनगर येथे नागरिकांच्या घरात तुंबलेल्या गटारीचे पाणी शिरले होते. पाऊस सुरू झाल्यानंतर काहीच वेळात घरामध्ये एका फुटापर्यंत पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
-----------------
वाढीव भागात सोयी-सुविधांचा अभाव
इचलकरंजी शहर वाढीव भागात महापालिकेकडून देण्यात येणाऱ्‍या सोयी-सुविधांचा अभाव दिसून येत आहे. शहरात कामगार वस्ती अधिक असल्याने येथे दाटीवाटीच्या वस्त्या आहेत. अशा ठिकाणी साफसफाई किंवा सुविधा उपलब्ध नसतील तर येथे साथीचे आजार पसरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून खबरदारी घेणे आवश्यक आहे.
------------------
हा भाग सखल असून, येथे पाणी मोठ्या प्रमाणात येत असते, मात्र येथील सारण गटारीची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नाही. महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
-गजानन शिरगावे, स्थानिक रहिवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com