‘अकरावी’ची पहिली फेरी मंगळवारपासून

‘अकरावी’ची पहिली फेरी मंगळवारपासून

‘अकरावी’ची पहिली फेरी मंगळवारपासून

ऑनलाईन अर्जातील दुसरा भाग भरता येणार; आतापर्यंत ५१६६ विद्यार्थ्यांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : शहरातील २९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी विद्या शाखेच्या प्रवेशाची पहिली फेरी मंगळवार (ता. ११) पासून सुरू होणार आहे. यादिवशी दुपारी तीन वाजल्यांपासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जातील दुसरा भाग भरता येणार आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने दहावीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी दुपारी एक वाजल्यांपासून विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली. त्यामध्ये आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत विज्ञान, वाणिज्य इंग्रजी शाखेसाठी एकूण पाच हजार १६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीच्या मूळ गुणपत्रिकांचे वाटप मंगळवारी होणार आहे. त्यादिवशी प्रवेशाची पहिली फेरी समिती सुरू करणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक समितीने जाहीर केले आहे. १६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीनमधून ऑनलाईन अर्ज (भाग-२) भरावा. या कालावधीदरम्यान भाग-१ भरण्याची सुविधा सुरू राहणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या व्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय समितीचे मुख्य केंद्र असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल ॲन्‍ड ज्युनिअर कॉलेज (जुना बुधवारपेठ) येथून आपले गुण समकक्ष करून प्रवेश अर्जाचा भाग-२ भरावा, असे आवाहन समितीने केले आहे. कला, वाणिज्य मराठी माध्यम शाखेचे प्रवेश कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून आरक्षण आणि गुणवत्तेनुसार ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.
...
तक्रार अर्ज करा ऑनलाईन
गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाबाबतच्या तक्रारींचे निराकारण २१ आणि २२ जून रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीबाबत तक्रार असल्यास ती केवळ ऑनलाईन पद्धतीने नोंदवावीत. या व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
...
पहिल्या फेरीचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्जातील दुसरा भाग भरणे : ११ ते १६ जून
अर्जाची छाननी, निवड यादी तयार करणे : १६ ते २० जून
निवड यादीची प्रसिद्धी : २१ जून
निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे :२१ ते २५ जून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com