लोकसभा प्रमुख नेत्यांच्याच गावात कमी मतदान

लोकसभा प्रमुख नेत्यांच्याच गावात कमी मतदान

नेत्यांच्या गावातच मंडलिकांना कमी मताधिक्य
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना प्रमुख नेत्यांच्याच गावातच मताधिक्य मिळालेले नाही. तर, मंडलिक यांच्या प्रचारात असणाऱ्या नेत्यांच्या गावातही श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना मताधिक्य मिळाले आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गावात शाहू महाराज यांना ४४४३ तर, मंडलिक यांना ३१६७ मते मिळाली आहे. गारगोटीतून शाहू महाराज यांना १२७६ मताधिक्य मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे समरजितसिंह घाटगे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह महायुतीच्या सर्वच घटक पक्षांची प्रचंड ताकद असतानाही माजी खासदार मंडलिक यांना अपेक्षित मते मिळू शकली नाहीत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा प्रभाव दिसून आला. मतदारांनी शाहू महाराज यांनाच पसंती दिली आहे. मंडलिक यांच्या मुरगूड गावातच शाहू महाराज यांना ४७१४ तर मंडलिक यांना ६४९० मते मिळाली आहे. त्यांच्याच गावात त्यांना १७७६ इतके कमी मताधिक्य मिळाले आहे. कागल शहरात पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे या दोन नेत्यांच्या शहरात एकूण २८ मतदान केंद्रे होती. यामध्ये मंडलिक यांना ११,४४४ तर, शाहू महाराज यांना १०,४४९ मते मिळाली आहेत. मंडलिक यांच्याबाजूने ठाम उभे असणाऱ्या मुश्रीफ आणि घाटगे यांच्या शहरात मंडलिक यांना केवळ ९९५ मतांची आघाडी मिळाली आहे. कागल शहरातील केंद्र क्रमांक ३८ मध्ये शाहू महाराज यांना ६६७ आणि मंडलिक यांना २३२ मते मिळाली आहेत. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या घोटवडे या गावात शाहू महाराज यांना १३८९ आणि मंडलिक यांना ६१० मते मिळाली आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मुदाळ या गावात शाहू महाराज यांना १४५८ व मंडलिक यांना ५०५ मते मिळाली आहे. एकूणच जिल्ह्यातील मतदारांचा कौल हा शाहू महाराज यांच्याकडे असल्याचे दिसून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com