शिवसेना ठाकरे गट विश्‍लेषण

शिवसेना ठाकरे गट विश्‍लेषण

लोगो
शिवसेना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या
वरदहस्तामुळेच उभारी

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर ः शिवसेनेच्या फुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नेते कार्यकर्तेही विभागले गेले. यातून शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून उभारी देण्यासाठी जीवाचे रान केले. त्यातून हातकणंगलेतील खासदारांना निसटते यश मिळाले. मात्र, याच शिवसेनेला विधानसभेत स्वतंत्र लढण्यासाठी आजच्या घडीला दहा चर्चेतील नावे सांगणेही कठीण आहे. त्यामुळे जी शिवसेना जिल्ह्याचे राजकारण बदलू शकेल तेथे आजच्या घडीला नेत्यांसह कार्यकर्त्यांची कमतरता आहे, हे विसरून चालणार नाही.
जिल्ह्यात शिवसेना रुजली, वाढली तर नक्कीच भविष्यात लोकसभा आणि विधानसभेला त्याचा चांगला हातभार लागेल ही मुख्यमंत्री शिंदे यांची दूरदृष्टी होती. ती योग्यच आहे. जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांना पुन्हा विजयी करण्यासाठी त्यांनी जिल्ह्यात राहून लावलेली फिल्डिंग, केलेले रोड शो नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. त्यांची हीच ताकद जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाठीशी राहिली तर नक्कीच शिवसेना जिल्ह्याचे राजकारण बदलण्यात कमी पडणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यात थेट शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर केवळ राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर आहेत. अपक्ष असलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी नंतर पाठिंबा दिला, तर कोल्हापूर शहरात राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना मिळालेल्या पदामुळे शिवसेना चर्चेत आहे.
जिल्ह्यात तळागाळापासून नेत्यांपर्यंत पुन्हा शिवसेना उभी करावी लागेल, ही मुख्यमंत्र्यांची दूरदृष्टी सत्यात उतरल्यास जिल्ह्याचे राजकारण शिवसेनेसोबत फिरत राहील. अन्यथा ही शिवसेना नावापुरती राहिल, हेही विसरून चालणार नाही. कारण खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसैनिक मुरलीधर जाधव अशी मोजकी नावे डोळ्यांसमोर येतात याचाही विचार आवश्‍यक आहे.

चौकट
एक जागा मिळवितानाच पळताभुई
येथे भाजपसह अन्य मित्रपक्ष सोबत असतानाही शिवसेनेला एक जागा मिळविताना पळताभुई थोडी झाली. आता भविष्यात विधानसभेची गणिते जुळवताना कोणाची नावे घ्यायची यासाठी विचार करण्याची वेळ आहे. दोन वेळा शिवसेना युती, आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आली. पण, जिल्ह्याला एकदाही मंत्री पद मिळाले नाही.

घडले काय?
हातकणंगलेतील खासदारांना निसटते यश
राजकारण बदलू शकेल तेथे नेते, कार्यकर्त्यांची कमतरता
तळागाळापासून नेत्यांपर्यंत शिवसेना उभी करण्याचे आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com