पोलिसवृत्त

पोलिसवृत्त

लक्षतीर्थ वसाहतीतून
रिक्षाची चोरी

कोल्हापूर ः लक्षतीर्थ वसाहत येथील गणेश मंदिरासमोर पार्क केलेली रिक्षा अज्ञाताने चोरून नेली. याबाबत बंडू बाळू पाटोळे (वय ४२) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. १ जूनला सकाळी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
पाटोळे यांनी दोन वर्षांपूर्वीच सेकंडहॅन्ड रिक्षा घेतली होती. नेहमीप्रमाणे ३१ मे रोजी लक्षतीर्थ वसाहतीतील पहिल्या बस स्टॉप येथील गणेश मंदिरासमोर रिक्षा लावली. सकाळी ते रिक्षा नेण्यास आले असता ती जागेवर मिळाली नाही. कोणीतरी मस्करी केली असे समजून त्यांनी मित्रांकडे चौकशी केली. अखेर रिक्षा चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी बुधवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली.
.................
एसटी बसमधून
मोबाईलची चोरी
कोल्हापूर ः रंकाळ स्टॅन्ड येथे बसमध्ये बसताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाचा मोबाईल चोरला. बुधवारी सायंकाळी गगनबावडा बसमध्ये हा प्रकार घडला. याबाबत उत्तम बाबूराव पाटील (वय ३४, रा. शेणवडे, गगनबावडा) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली.
.................
किरकोळ वादातून
घर पेटवण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : यादवनगरात किरकोळ वादातून घर पेटविण्याचा प्रकार घडला. डवरी वसाहत येथील अनिकेत शामराव जगताप (वय २२) याने विशाल सुरेश शिंदे (वय २५) याच्या घरातील साहित्याची तोडफोड करीत धक्काबुक्की केली. काही वेळाने पुन्हा येथे येऊन घराच्या दरवाजावर रॉकेल टाकून घर पेटवण्याचा प्रयत्न केला.
..............
संशयास्पद हालचाली;
एकजण ताब्यात

कोल्हापूर, ता. ६ ः मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अंधारात चोरीच्या उद्देशाने लपून बसलेल्या संशयिताला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. सुनील संभाजी जाधव (वय ४२, रा. टेंबलाई नाका) असे संशयिताचे नाव आहे. संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com