गडहिंग्लजमधील होर्डींग हटवा

गडहिंग्लजमधील होर्डींग हटवा

गडहिंग्लजमधील
होर्डींग हटवा
गडहिंग्लज : शहरातील पालिका हद्दीत असलेले धोकादायक व बेकायदा होर्डिंग बोर्ड हटवण्याची मागणी मनसेने केली आहे. याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. घाटकोपरमधील घटनेने होर्डिंगच्या धोक्याचे गांभीर्य वाढले आहे. पालिकेने शहरातील होर्डिंगचा सर्व्हे केला आहे. त्यानंतर प्रशासनाने संबंधितांना बोर्ड काढून घेण्याची सूचना दिली आहे. केवळ बोर्ड उतरविले आहेत, परंतु शहरात अनेक ठिकाणी लोखंडी सांगाडे तसेच आहेत. दसरा चौक हा नेहमी गजबजलेला असतो. जनता नाट्यगृहात अनेक कार्यक्रमही होत असतात. त्यामुळे तेथील सांगाडे काढून घेण्याची गरज आहे. याठिकाणी नवीन होर्डिंग लावण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com