राज्याभिषेक सोहळादिनी शिवरायांना अभिवादन

राज्याभिषेक सोहळादिनी शिवरायांना अभिवादन

gad65.jpg
88460
गडहिंग्लज : येथे राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवाजी मराठा मंडळातर्फे दसरा चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला अभिवादन केले.

राज्याभिषेक सोहळादिनी
शिवरायांना अभिवादन
गडहिंग्लज : येथील शिवाजी मराठा मंडळाच्यावतीने दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अभिवादन केले. महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर यांच्या हस्ते पूजा केली. मराठा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांच्या हस्ते दसरा चौक परिसरात साखर-पेढ्यांचे वाटप केले. यावेळी यशवंत कोले, प्रतापराव सरदेसाई, एल. डी. पोवार, प्रकाश पोवार, विद्याधर गुरबे, प्रा. शिवाजी भुकेले, आदी उपस्थित होते.
-----------------------------------------
खोची परिसर
खोची : शिवराज्य दिन खोचीसह परिसरात उत्साहात साजरा केला. खोची ग्रामपंचायतीत गुढी उभारून व शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिमापूजन सरपंच स्नेहा पाटील, उपसरपंच सुहास गुरव यांनी केले. यावेळी सदस्य अभिजित चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, प्रमोद गुरव, पूनम गुरव, आदी उपस्थित होते. भेंडवडे ग्रामपंचायतीत गुढी उपसरपंच हणमंत पोवार यांच्या हस्ते उभी केली. शिवप्रतिमा पूजन संग्राम माने यांनी केले. सरपंच स्नेहल माने, अभिजित माने, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकाते, आदी उपस्थित होते. बुवाचे वठार ग्रामपंचायतीत शिवप्रतिमा पूजन केले. सरपंच मंगल परीट, कृष्णात वठारकर, विजय कागवाडे, ग्रामसेविका व्ही. एस. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
---------------
तारदाळ परिसर
तारदाळ : येथे शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे सकाळी दहा ते अकरा या वेळेत विधिवत पूजा झाली. यामध्ये मंत्रोपचार पठण, श्रींच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य संतोष खोचरे व गणेश गायकवाड यांच्या हस्ते करण्‍यात आला. सरपंच पल्लवी पोवार, जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर, जयप्रकाश भगत, चंद्रकांत तांबवे, आदी उपस्थित होते. सायंकाळी मिरवणूक काढली.
-----------
आजरा परिसर
आजरा : आजरा तालुका मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. मराठा महासंघातर्फे १८ वर्षे हा कार्यक्रम होत असून, यानिमित्त वृक्षारोपण करण्‍यात येते. एरंडोळच्या (ता. आजरा) सरपंच सरिता पाटील, उपसरपंच भीमराव माधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मराठा महासंघाचे कार्यकारिणी सदस्य विष्णू सुपल यांच्या शेतामध्ये वृक्षारोपण केले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देसाई, आदी उपस्थित होते.
------------
कुडुत्री परिसर

कसबा तारळे : कुडुत्री (ता. राधानगरी) येथे कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन संघाचे संस्थापक-अध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी संघाचे राधानगरी तालुकाध्यक्ष पांडुरंग आवळकर होते. जिल्हाध्यक्षा अनिता मगदूम, जिल्हा संघटक अशोक पोवार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश सुतार, आदी उपस्थित होते. संघाचे युवा राजाध्यक्ष विश्वास आरडे यांनी स्वागत केले. राज्य संपर्कप्रमुख रामचंद्र चौगले यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा युवाध्यक्ष प्रसाद माळवी यांनी सूत्रसंचालन केले.
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com