कोल्हापूर जिल्हा संघाला उपविजेतेपद

कोल्हापूर जिल्हा संघाला उपविजेतेपद

88464
कोल्हापूर : स्पर्धेतील उपविजेता ठरलेला के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर महिला फुटबॉल संघ.
........
लोगो ः आंतरजिल्हा ज्युनिअर महिला फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर जिल्हा संघाला उपविजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा ज्युनिअर गर्ल्स फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा पालघर येथे झाली. स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा महिला संघाने उपविजेतेपद पटकावले.
स्पर्धेचा अंतिम सामना कोल्हापूर विरुद्ध ठाणे संघ यांच्यात झाला. सामना पूर्णवेळ गोल शून्य बरोबरीत राहिला. जादा वेळामध्ये ठाणे संघाने मिळालेल्या फ्री किकवर गोल नोंदवत विजय मिळवला.

कोल्हापूर संघातील खेळाडू
आसावरी पाटील (गोलकिपर), युगंधरा चौगले, निकिता साळोखे, प्रथमा पाटील, केतकी कारंडे, जान्हवी ढेरे, सिद्धी सूर्यवंशी, समीक्षा मेंगाणे, प्रांजली कांबळे, समृद्धी ढेरे, सुमया देसाई, साधना खाडे, संयोगिता शिंदे, वैभव कानडे, पूर्वा भोसले, यशस्वी बेनाडी, अदिती ढेरे, केतकी कोंडस्कर. मुख्य प्रशिक्षक म्हणून निखिल सावंत व व्यवस्थापक म्हणून भक्ती बिरनगड्डी यांनी काम पाहिले.
............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com