आरटीओ अधिकारी बदल्या...

आरटीओ अधिकारी बदल्या...

फोटो ः 88516

प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी विजय चव्हाण
दीपक पाटील यांची जळगावला, रोहित काटकरांची ठाण्याला पदोन्नतीने बदली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांची पदोन्नतीने कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) पदी नियुक्ती झाली आहे. येथील प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची पदोन्नतीने जळगाव येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर आज बदली झाली. ते उद्या (ता.७) सकाळी अकराच्या सुमारास पदभार स्वीकारणार आहेत. तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांची पदोन्नतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर ठाणे येथे बदली झाली. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी हे आदेश दिले.
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार काही वर्षापासून प्रभारी अधिकाऱ्यांचाच हातात होता. सध्या कार्यरत असलेले दीपक पाटील आज पदमुक्त झाले. त्यांच्या पदभार त्यांनी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांच्याकडे सोपविला.
दरम्यान, राज्यात एकूण अकरा सहायक परिवहन अधिकाऱ्यांना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. त्यामुळे येथील रोहित काटकर यांचाही सहभाग आहे. अद्याप मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यांचीही संख्या मोठी आहे. त्यांच्या बदल्या ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. साधारण पुढील दोन दिवसांत अन्यथा जूनच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

चौकट
चव्हाण यांनी येथे बजावली सेवा
नवीन प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण मुळचे बुलढाणा येथील आहेत. त्यांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरातून बी.ई.मॅकेनिकलचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २००० मध्ये ते परिवहन विभागात कार्यरत झाले. त्यांनी आजपर्यंत परभणी, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि सध्या गडचिरोली येथे सेवा बजावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com