शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

88426

स्वराज्य गुढीद्वारे छ. शिवरायांना मुजरा
जिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक दिन; प्रतिमा पूजनासह कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्यावतीने शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारली. जिल्हा परिषद आवारातील कागलकर वाड्याच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते ही गुढी उभारली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन ‘महाराष्ट्र गाथा’ हा शिवछत्रपतींच्या जीवनपटावर आधारित कार्यक्रम झाला.
कागलकर हाऊस परिसरात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शाहिरी, ही माय भूमी, शिवगाथा, गोंधळी नृत्य, बाजीप्रभू देशपांडे यांचा प्रसंग, शूर आम्ही सरदार, मराठी पाऊल पडते पुढे असे सांस्कृतिक सादरीकरणातून परिसर शिवमय झाला. ग्रामसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या सागर चौगुले यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. अतिशय उत्साहात, जोमाने सादर केलेल्या विविध प्रसंगांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. एक तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील विविध प्रसंग नृत्य व नाटिकेतून सादर करून शिवरायांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचे आत्मभान जागे केले. जनतेच्या मनातले आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणले. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले असा संदेश कार्यक्रमातून दिला. जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायतीत असे कार्यक्रम घेतले. या कार्यक्रमावेळी माझी मायबोली राधानगरी प्रस्तुत गाथा महाराष्ट्राची कार्यक्रमातून शिवरायांच्या जीवनपटाला उजाळा दिला. यावेळी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देषाई उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com