शिव राज्याभिषेक दिन

शिव राज्याभिषेक दिन

पट्टी ः शहर परिसरात शिवराज्याभिषेक दिन

04169
शिवराज्याभिषेकदिनी
पन्हाळगडावर युद्धकलेची प्रात्यक्षिके

पन्हाळा ः येथे शिवसेना ठाकरे गटाच्या पुढाकाराने शिवमंदिरात जलाभिषेक, दुग्धाभिषेक,युद्धकलेची प्रात्यक्षिके करून उत्साहात ३५० वा शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. शिवराज्याभिषेकनिमित्त दोन दिवस विविध उपक्रम राबविले. बुधवारी सायंकाळी दीपोत्सव व गडपूजन कार्यक्रम झाला. आज दक्षिण भारतातील जिंजी, तंजावर, बंगळूर फोर्ट, साजरा गोजारा किल्ला, वेल्लूर, सर्जाकोट, राजकोट व महाराष्ट्रातील राजगड, सिंधुदुर्ग किल्ल्यांवरून आणलेल्या पवित्र जलाचे मंत्रोच्चारात शिवमंदिराजवळ पूजन केले. जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, संजय चौगले यांच्याहस्ते झालेल्या कलश पूजनाचे पौरोहित्य शाहू वैदिक विद्यालय कोल्हापूर येथील राजेंद्र वेदांते यांनी केले. त्यानंतर शिवमंदिरातील छत्रपतींच्या पुतळ्यास जलाभिषेक व दुग्धाभिषेक केला. यावेळी शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच कोल्हापूर यांनी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली. लेझीमच्या ठेक्यात व पारंपरिक वाद्यांच्या गजरात छत्रपतींच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढली. अंबाबाई मंदिराजवळ पालखी सोहळ्याने सांगता झाली. यावेळी महिला संघटिका शुभांगी पोवार, अवधूत साळोखे, प्रज्ञा उत्तुरे, कृष्णात जासूद, प्रदीप हांडे, सुनील जोशी, राजू सांगावकर, दिलीप देसाई, विवेक काटकर, महेश उतुरे, रघुनाथ टिपूगडे, माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, बाबा पाटील, मारुती माने यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

88414
महापालिकेतर्फे शिवराज्याभिषेक दिन
कोल्हापूर ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज राजर्षी छत्रपती शाहू सभागृहातील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपायुक्त साधना पाटील, नगरसचिव सुनील बिद्रे, आस्थापना अधीक्षक राम काटकर, अधीक्षक विश्वास कांबळे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते.
----------
88491

शिवसेनेतर्फे शिवप्रतिमेचे पूजन
कोल्हापूर ः येथील ऐतिहासिक शिवाजी चौकात शिवराज्याभिषेक दिन झाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शिंदे गटातर्फे सोहळा साजरा झाला. यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक केला. यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मानाचा मुजरा केला. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा दिल्या. साखरपेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर झाली.

88419
नेताजी तरुण मंडळ
कोल्हापूर ः येथील नेताजी तरूण मंडळातर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरिष गायकवाड यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. छत्रपती शिवरायांचे विचार जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आपली पिढी हे विचार जपेल, अशी शपथ सर्वांनी घेतली. यावेळी स्वप्नील करले, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, ॲड. अभिजीत करंबे, शैलेश मोरे, सिकंदर पठाण, जयराज म्हाडगुत उपस्थित होते.

हिंदू एकता आंदोलन
मिरजकर तिकटी येथे हिंदू एकता आंदोलनातर्फे शिवराज्याभिषेक दिनी संघटनेच्या जिल्हा कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे बाबा वाघापूरकर यांच्याहस्ते पूजन झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले, दीपक देसाई, हिंदूराव शेळके, किशोर घाटगे, बबन लगारे, महादेव कुकडे, आनंदा कवडे, प्रकाश आयरे उपस्थित होते.

88529
गोकुळ दूध संघ
कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने ताराबाई पार्क कार्यालयात प्रतिमापूजन झाले. संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी संचालक कर्णसिंह गायकवाड, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. प्रकाश साळुंखे, गुणनियंत्रण व्यवस्थापक आर. व्ही. पाटील, व्यवस्थापक खरेदी के. एन. मोळक, संकलन अधिकारी दत्तात्रय वाघरे, बी. आर. पाटील, डॉ. प्रकाश दळवी, बाजीराव मुडकशिवाले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, विनोद वानखेडे व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

‘यशवंत आयुर्वेदिक’मध्ये रक्तदान शिबिर
कोडोली : येथील यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी रक्तदान शिबिर झाले. अंबाबाई मंदिराच्या सभागृहात कार्यक्रम झाला. उद्घाटन यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. ५३ दात्यांनी रक्तदान केले. रक्तसंकलन महात्मा गांधी ब्लड बँकेने केले. शिबिरासाठी नईम मुल्ला, सिद्धार्थ पवार, सुहील जंगम, ओंकार कुंभार, आयुब, अमित पाटील, प्रतीक मेनकर, हर्षवर्धन बागल आदींनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com