गुंडाच्या खूनाच्या रागातून डवरी वसाहतीत तोडफोड

गुंडाच्या खूनाच्या रागातून डवरी वसाहतीत तोडफोड

गुंडाच्या खुनाच्या रागातून डवरी वसाहतीत तोडफोड
पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा; वकिलासह २० जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : गुंड अजय शिंदे याच्या खुनाच्या रागातून राजारामपुरी डवरी वसाहतीतील घरात शिरून तोडफोड करण्यात आली. शिंदे याचा रंकाळा तलावाजवळ भरदिवसा खून करण्यात आला होता. या घटनेपासून दोन गटांतील वाद धुमसत आहे. खुनाच्या कारणातून शेवंता जगताप यांच्यासह तीन घरांमधील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करण्यात आले. या प्रकारानंतर भागातील महिलांना घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढल्याप्रकरणी ॲड. गिरीष नाईक यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्‍ह्यातलागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
घरात घुसून संसारोपयोगी साहित्याची तोडफोड करत दहशत माजवल्याबाबत शेवंता मोहन जगताप (वय ५०, रा. डवरी वसाहत, यादवनगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी आकाश संजय माळी, सुरेश संजय माळी, अनिकेत शामराव जगताप (तिघे, रा. यादवनगर) अशा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, ॲड. नाईक यांच्यासह महिलांनी बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून संशयितांवर कारवाई करण्‍याचे निवेदन दिले. याबाबत शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत गर्दी जमविल्याप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल झाला. पोलिस अंमलदार विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ॲड. नाईक, जनाबाई निवृत्ती माळी, शेवंता मोहन जगताप, वैजयंती श्रीकांत माळी, लक्ष्मी दशरथ शिंदे, निशा अर्जुन शिंदे, शालन मुनार जगताप, अंजना निवृत्ती माळी, भारती विलास शिंदे, रेश्मा देवेंद्र शिंदे, रेश्मा दीपक जगताप, ईश्वर उत्तम माळी, आकाश दशरथ शिंदे, देवेंद्र दशरथ शिंदे, अर्जुन यशवंत शिंदे, संभाजी महादेव शिंदे, श्रीकांत निवृत्ती माळी, मोहन सादू जगताप, करण सुदाम शिंदे आणि दीपक मनोहर जगताप (सर्व, रा. यादवनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com