शिवराज्याभिषेक मिरवणुकीतून प्रबोधनाचा जागर

शिवराज्याभिषेक मिरवणुकीतून प्रबोधनाचा जागर

फोटो
88508, 88509
-----
‘शिवराज्याभिषेक’ मिरवणुकीतून प्रबोधनाचा जागर
मराठा महासंघातर्फे आयोजन; मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराज की जय..., जय भवानी..., जय शिवाजी..., असा अखंड जयघोष..., आकाशात भिरभिरणारे भगवे ध्वज..., धनगरी ढोलाचा दणदणाट..., महिलांचे लेझीम पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण..., वारकऱ्यांचे टाळ मृदुंगाच्या गजरात सुरू असलेली अभंगवाणी..., छत्रपती शिवरायांच्या कार्यकतृत्वाचा उजाळा देणारे, पंचगंगा प्रदूषणासह शहरातील विविध प्रश्‍नांवर भाष्य करणारे प्रबोधनाचे फलक..., असे चैतन्यदायी मंगलमय वातावरण आज सायंकाळी पाहायला मिळाले. निमित्त होतं मराठा महासंघातर्फे आयोजित ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मिरवणुकीचे.
मंगळवार पेठ येथील मराठा महासंघाच्या शहर कार्यालय येथे सायंकाळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक मिरवणुकीचे उद्‍घाटन झाले. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, डॉ. रमेश जाधव, वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील, ॲड. धनंजय पठाडे, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, अशोक भंडारे, संदीप देसाई, वस्ताद आनंदराव ठोंबरे, लाला गायकवाड, सचिन चव्हाण, भगवानराव काटे, गणी आजरेकर, कादर मलबारी, बयाजी शेळके, डॉ. संदीप पाटील, डी. जी. भास्कर, उदय देसाई, सुनीता पाटील, माणिक मंडलिक, मिलिंद पाटील, महादेव महाराज यादव, महेश सावंत, सुभाष जाधव, कमलाकर जगदाळे, चंद्रकांत चव्हाण, शैलजा भोसले, अजित सासने, संपतराव चव्हाण-पाटील, विनायक घोरपडे, शिवराजसिंह गायकवाड, अवधूत पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
मिरवणुकीत सजविलेल्या वाहनावर छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर आरुढ असलेली मूर्ती विराजमान केली होती. मिरवणुकीतील रिक्षांवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या कार्याचा उजाळा देणाऱ्या फलकांसह निर्मळ पंचगंगेची गटारगंगेकडे वाटचाल, घर तेथे एक झाड वृक्षारोपण, थंडगार कोल्हापूरचा पारा ४० डिग्री सेल्सिअसवर, रंकाळा वाचवा, राष्ट्रपुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करू नका, जातीभेद गाडा, असे प्रबोधनपर फलक लक्ष वेधत होते. त्या पाठोपाठ धनगरी ढोलांचा दणदणाट, वारकऱ्यांकडून टाळ मृदुंगाच्‍या गजरात सुरू असलेली अभंगवाणी, महिलांच्या लेझीम पथकाचे लक्षवेधी सादरीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील बालचमू, चित्तथरारक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, भगवे फेटे परिधान केलेले शिवप्रेमी व महिला अशा वातावरणात मिरवणूक निघाली. मिरवणूक मिरजकर तिकटी, बिनखांबी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिकामार्गे छत्रपती शिवाजी चौक येथे आली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. शिवराज्याभिषेक मिरवणूक मिरजकर तिकटी येथे आल्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यातील मर्दानी खेळ आखाड्यांच्यावतीने मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांतून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.

चौकट
शाहू महाराज, सतेज पाटील यांनी धरला ठेका
मिरवणुकीत खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह सतेज पाटील, वसंतराव मुळीक यांनी हातात लेझीम घेऊन ठेका धरला. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी जयघोष करीत त्याला दाद दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com