कागदपत्रांत फेरफार करून वाहने विकणाऱ्या टोळीला ६ दिवसांची कोठडी

कागदपत्रांत फेरफार करून वाहने विकणाऱ्या टोळीला ६ दिवसांची कोठडी

कागदपत्रांत फेरफार करून वाहन
विक्री करणाऱ्या टोळीला कोठडी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : मिनी बसेसच्या चेसिस व नोंदणी क्रमांकात फेरफार करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जुन्या वाहनांची कागदपत्रे विकत घेऊन त्यात फेरफार करीत शासनाचा कर चुकविण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू होता. चेसिस क्रमांक, नंबरप्लेट बदलून, अशी वाहने फिरविणाऱ्या चौघांसह हा फेरफार करणारा मुख्य संशयित अमित ऊर्फ प्रशांत रामदास भोसले (वय ३७, रा. भारतीनगर, मोरेवाडी), मेकॅनिक करीम गफूर शेख (५२, रा. गोकुळ शिरगाव) पोलिसांच्या ताब्यात आहे. सर्वांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
अटक केलेल्यांत पंकज तानाजी मोरे (३०, रा. पोर्ले, पन्हाळा), रूपेश विलास पवार (३४, रा. राजारामपुरी), विशाल परशराम चव्हाण (२२, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ), संभाजी आनंदा धनगर (३३, रा. वडणगे, ता. करवीर) या चौघांचाही समावेश आहे.
बंद गाड्यांची कागदपत्रे मिळवून त्यामध्ये फेरफार करून दुसऱ्या बसेस फिरविण्यात येत होत्या. उपप्रादेशिक परिवहन खात्याची दिशाभूल करून मास्टर माईंड अमित ऊर्फ प्रशांत रामदास भोसले याच्याकडून हा प्रकार सुरू होता.

चौकट
आरटीओतील हस्तक सापडणार का?
अमित भोसले आरटीओ कार्यालयात बसूनच ही बेकायदेशीर कामे करीत होता, अशी माहिती पुढे आली आहे. कागदपत्रात फेरफार केलेल्या वाहनांचा अपघात झाल्यास अनेक कुटुंबे उद्‍ध्वस्त होऊ शकतात. या प्रकारात कार्यालयातील सहभागी अधिकारी, लिपिक, एजंट यांचीही चौकशी करून त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com